‘गुलमोहर’मध्ये शर्मिला टागोरच्या पतीची भूमिका कोणी साकारलीय?

Gulmohar Movie : राहुल चित्तेला (Rahul Chittella) दिग्दर्शित ‘गुलमोहर’ (Gulmohar) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राहुल चित्तेलाने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee), शर्मिला टागोर (Sharmila Tagore), सूरज शर्मा (Suraj Sharma) आणि अमोल पालेकर (Amol Palekar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात शर्मिलाने कुसुम बत्राचे पात्र साकारले आहे. सिनेमात शर्मिलाच्या पतीचे निधन झाले असून एका फ्रेममध्ये तिच्या पतीची झलक पाहायला मिळाली आहे. सिनेमातील शर्मिलाच्या पतीने प्रेक्षकांना मात्र आश्चर्यचकित केलं आहे. 

‘गुलमोहर’ सिनेमाच्या एका फ्रेममध्ये कुसुम बत्राच्या पतीचा फोटो पाहायला मिळत आहे. फोटोत दाखवण्यात आलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय भारतीय सिने-निर्माते रमेश शर्मा (Ramesh Sharma) आहेत. रमेश शर्मा यांनी ‘न्यू दिल्ली टाइम्स’ (1986) (New Delhi Times) हे नाटक आणि ‘अहिंसा गांधी : द पॉवर ऑ द पॉवरलेस’ (Ahimsa Gandhi : The Power Of Powerless) सारख्या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या कलाकृतींमधील कथांनी प्रेरित होऊन निर्मात्यांनी बत्रा कुटुंबाचा सर्वेसर्वा म्हणून रमेश शर्मा यांची निवड केली आहे. 

हेही वाचा :  The Family Man 3 : 'द फॅमिली मॅन 3' ची प्रतीक्षा संपली

‘गुलमोहर’ (Gulmohar Movie) या सिनेमाचा दिग्दर्शक राहुल चित्तेला रमेश शर्माच्या (Ramesh Sharma) ‘न्यू दिल्ली टाइम्स’चा (New Delhi Times) मोठा चाहता आहे. या नाटकात शशी कपूर (Shashi Kapoor), ओम पुरी (Om Puri) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) मुख्य भूमिकेत होते. राहुल हा रमेश यांचा आणि त्यांच्या सिनेमांचा मोठा चाहता आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमात रमेश शर्मा असावेत अशी राहुलची इच्छा होती. 

राहुलने आपल्या पहिल्या सिनेमासाठी रमेश शर्मा यांना विचारणा केली होती. पण इतर कामात व्यस्त असल्यामुळे रमेश यांना राहुलची ऑफर स्वीकारता आली नाही. पण तरीदेखील रमेश शर्मा राहुलच्या ‘गुलमोहर’चा भाग होऊ शकले. पतीच्या निधनामुळे शर्मिलाच्या आयुष्यात एक ट्विस्ट आला आहे हे जेव्हा सिनेमात दाखवण्यात येते तेव्हा रमेश शर्मा यांची झलक पाहायला मिळते. रमेश शर्मा यांनी 2006 मध्ये ‘द जर्नलिस्ट’ (The Journalist) आणि ‘द जिहादी : द मर्डर ऑफ डॅनियल पर्ल’सारखे (The Jihadi : The Murder Of Daniel Pearl) माहितीपट बनवले आहेत. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 04 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …