Wedding Video : लग्नामध्ये नवीन Trend, व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा!

Bride Groom Viral Video : हिंदू धर्मात लग्न (Wedding Video) या संस्काराला विशेष महत्त्व आहे. राज्यानुसार नंतर धर्मानुसार प्रत्येक लग्नाचे विधी आणि परंपरा या वेगळा आहेत. प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याकडून मानसन्मान आणि प्रेम मिळावं. आजची तरुण पिढी ही स्त्री पुरुष असा भेद करत नाही. प्रत्येक गोष्टीतील बरोबरीने चालणारे आजच्या पिढीतील कपल हे घरातही एकमेकांना कामात हात भार लावतात. (Groom Viral Video)

सोशल मीडियावर (Viral Video) काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओमधून लग्नातील नवीन ट्रेंड समोर आला आहे. आपल्याकडे भारतात नवरदेवाला देवाचं रुप मानलं जातं. त्यामुळे नवरीने नवरदेवाच्या पाया पडण्याची परंपरा आहे. आपण अनेक वेळा महिलांना बोलताना ऐकलं आहे, की फक्त नवरीनेच का पाया पडायचं? जर समान वागणुकीची गोष्ट होतं आहे. तर नवरदेवानेही नवरीच्या पाया पडलं पाहिजेत. (Viral Video Bride Groom)

बस्स मग लग्नातील ही परंपरा बदलत नवरदेवांनी नवीन ट्रेंड (Wedding Trend) आणला आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा नवरी नवरदेवाच्या पाया पडते त्यानंतर लगेचच नवरदेवही तिच्या पाया पडतो. हे दृश्य पाहून वऱ्हाडी मंडळी थक्क झाले. तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहिल्यावर तुम्ही बघू शकता जेव्हा नवरदेव नवरीच्या पाया पडतो तेव्हा वरमाय म्हणजे नवरदेवाची आई त्याला थांबवण्यासाठी जाते. (Wedding new trend groom bowed down and touched feet of bride viral Video social media most trending on google)

हा व्हिडीओ wedmegoodsouth या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होते आहे. 

हेही वाचा :  पोलिसांसमोर तरुणानं गायलं केसरिया गाणं; व्हिडीओ व्हायरल

अजून एका नवरदेवाने मंदिरात नवरीसोबत लग्न करताना हा ट्रेंड पुढे नेला आहे. या व्हिडीओमध्ये पहिले नवरी नवरदेवाच्या पाया पडते. तसंच लगेचच नवरदेव नवरीच्या पाया पडतो हे पाहून सगळे अवाक् होतात. नवरदेवाची आई त्याला थांबवते पण नंतर ती हसायला लागते. तर नवरी नवरदेवाच्या या कृत्यानंतर लाजून लाल होते. तर वरपिताने नवरदेवाला अंगठा दाखवून त्याचं कौतुक केलं. 

आपल्या लेकीला एवढ्या मान देणारा नवरा मिळाला हे पाहून त्या बापाला अजून काय हवं. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील keralawedding_styles या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

इन्स्टाग्रामवरील abhii.muralii या व्हिडीओमध्ये वर वधूच्या पाया पडतो, हे पाहून नवरीचे डोळे पाणावतात. नवरदेवाकडून मिळालेला सन्मान पाहून नवरी आनंदाने भारावून जाते. हे व्हिडीओ पाहून प्रत्येक मुलगी म्हणत आहे, नवरा असावा तर असा…

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच?

प्रफुल्ल पवार, झी मीडिया  Irshalwadi landslide: 19 जुलै 2023 रोजी रायगडमधील इरसाल वाडी या आदिवासी …

बालसुधार गृह म्हणजे काय, तिथे मुलांना काय सुविधा मिळतात? सर्व काही समजून घ्या!

Pune Accident News:  पुणे अपघात प्रकरणातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा जामीन बालहक्क न्यायालयाने फेटाळला आहे. …