‘विराट कोहली नसता तर…’, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये इतिहास रचणाऱ्या Sumit Nagal ला भावना अनावर!

Sumit Nagal, Australian Open 2024 : सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे.  सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात चमकदार कामगिरी केलीये. सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये सुमित नागल याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याचा पराभव केलाय. भारतीय टेनिससाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. 1989 नंतर आता सुमित याने सीडेड खेळाडूचा पराभव केला आहे. रमेश कृष्णन यांनी 1989 मध्ये अशी कामगिरी केली होती. एका मुलाखतीत नागलने त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितलं. खिशात फक्त 6 रुपये असताना विराट कोहलीच्या (Virat Kohli) पाठिंब्यानंतर त्याने कसा संघर्ष केला, यावर त्याने भाष्य केलं.

काय म्हणाला सुमित नागल?

विराट कोहलीच्या फाउंडेशनने मला 2017 पासून सपोर्ट केला आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून चांगली कामगिरी करत नव्हतो आणि आर्थिक संकटाचा सामना करत होतो. जर विराट कोहलीने मला पाठिंबा दिला नसता तर माझे काय झाले असते हे मला माहीत नाही’, असं भारतीय टेनिस स्टार सुमित नागल याने म्हटलं आहे. त्यावेळी बोलताना त्याला भावना अनावर झाल्या होत्या.

2019 च्या सुरुवातीला मी एका स्पर्धेनंतर कॅनडाहून जर्मनीला जात असताना माझ्याकडे फक्त सहा रुपये होते. यावरून मी किती संकटातून जात असेल याची कल्पना करा, पण मी वाचलो आणि गोष्टी चांगल्या होत आहेत. जर लोकांनी खेळाडूंना निधी दिला तर देशाला मदत होईल. भारतामध्ये खेळ भरभराटीला येईल. विराटचा पाठिंबा मिळाल्याने मी भाग्यवान ठरलो, असं नागलने म्हटलं आहे.

हेही वाचा :  केस गळतीपासून कायमस्वरूपी सुटका हवीय? मग कढीपत्त्याचे पाण्याचा करा असा वापर

आणखी वाचा – ‘हार्दिक फिट झाला तरी…’, पांड्याला ‘या’ खेळाडूमुळे मिळणार तीळ तांदूळ, सुनिल गावस्कर म्हणतात…

दरम्यान, सुमित नागल 2013 नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. सोमदेव देवबर्मनने 2013 मध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. त्याचबरोबर दुसऱ्यांदा कोणत्या भारतीय खेळाडूने ग्रँड स्लॅमच्या प्रमुख लढतीत विजय नोंदवला आहे. सुमित याने पहिल्या सेटपासूनच वर्चस्व मिळावलं. सुमितने अलेक्जेंडर बुब्लिक याचा 3-0 ने पराभव केला. सुमितने अलेक्जेंडर याचा सरळ तीन सेटमध्ये  6-4, 6-2, 7-6(5) असा पराभव केलाय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …