Video : भारत जिंकला! कतारमधील ‘ते’ माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले…

Indian Ex Navy Officers in Qatar Jail : जागतिक स्तरावर आपल्या कैक धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारत, देशानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून, देशाची कुटनीती पुन्हा एकदा वरचढ ठरली आहे हेत सिद्ध करणारी एक घटना नुकतीच घडलीये. कतार जेलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ‘त्या’ आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना मुक्त करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आठही भारतीय सुखरुप भारतात परतले आहेत. 

सप्टेंबर 2023 मध्ये अल दहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या 8 भारतीयांना अटक करण्यात आली होती, ऑक्टोबरमध्ये कतारच्या एका न्यायालयानं त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सातत्यानं भारत सरकारनं या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. पुढे डिसेंबर 2023 मध्ये दुबईतील COP 28 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यामध्येही या मुद्द्यावर चर्चा झाली होती. अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आलं आणि सर्व भारतीयांची सुटका झाली. 

सद्यस्थितीला भारताची परराष्ट्रीय धोरणं आणि देशाचं जागतिक स्तरावर असणारं स्थान पाहता हा भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय मानला जात आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी याप्रश्नी जातीनं लक्ष घातलं त्यामुळे सुखरुप भारतात परतलो अशी प्रतिक्रिया परतलेल्या सर्व भारतीयांनी दिली आहे. 

भारतात परतताच काय म्हणाले ‘ते’ भारतीय? 

कतारमधून मोठा संघर्ष करून मायदेशी परतलेले माजी नौदल अधिकारी भारतभूमीवर पाय ठेवताच भावूक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू लागले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्ती करत या प्रश्नात लक्ष घातलं नसतं तर आम्ही आज इथं उभेही राहू शरलो नसतो. भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्यांमुळंच हे शक्य होऊ शकलं आहे’, अशी प्रतिक्रिया यांच्यातील एका भारतीयानं दिली. 18 महिन्यांची प्रतीक्षा संपली असून, अखेर आपण मायदेशी परतलो, याबद्दल सर्वांनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 

हेही वाचा :  Stocks To Buy: जागतिक शेअर मार्केटला उसळी; 'या' Stocks मध्ये गुंतवणूक करुन मिळवा बंपर Returns

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …