Video : “बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारा”; वसतिगृहात विद्यार्थ्याला जबर मारहाण

गेल्या काही दिवसांपासून कॉलेजमधील रॅगिंगचे (ragging) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॅगिंगवर बंदी असतानाही अनेक महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे नवीन विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक केली जात आहे. हैदराबादमधील (Hyderabad) एका खासगी महाविद्यालयात एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इतर विद्यार्थी त्याला मारहाण करत असून धार्मिक घोषणा द्यायला सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या विद्यार्थ्यावर एका विशिष्ट धर्माविरुद्ध टिप्पणी केल्याचा आरोप आहे. सध्या याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रॅगिंगच्या कलमान्वयेही गुन्हा दाखल केला आहे.

हैदराबादमधील कॉलेजच्या वसतिगृहात (hostel room) एका विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरून 1 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्याला त्याच्या वसतिगृहातील मित्रांनी बेदम मारहाण केली होती. तो हैदराबादमधील आयएफएचई (IFHE) येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे.

या घटनेची 11 नोव्हेंबर रोजी पोलिसात तक्रार करण्यात आली होती. पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, “1 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता 15 ते 20 विद्यार्थी वसतिगृहाच्या खोलीत आले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी मला बेदम मारहाण केली आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. आरोपींनी  कपडे काढत नाही तोपर्यंत मारहाण करू, अशी धमकी दिली. या घटनेची माहिती कोणाला दिल्यास आणखी मारहाण केली जाईल, असेही त्यांनी म्हटले.”

“त्यांनी माझ्या चेहऱ्यावर ठोसा मारला, चापट मारली, पोटात लाथ मारली, गुप्तांगाला स्पर्श केला आणि जबरदस्तीने काही रसायन आणि पावडर खाऊ घातली. एका विद्यार्थ्याने त्याचा प्रायव्हेट पार्ट माझ्या तोंडात घालण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, मला नग्न केले आणि एकामागून एक मारहाण केली. ‘बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण करा’ असे ओरडत राहिले,” असे विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

हेही वाचा :  Rohit Shetty : सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी रुग्णालयात दाखल

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित विद्यार्थी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. तो विद्यार्थिनीसोबत हिच्याशी इन्स्टाग्रामवर एका मुलीबद्दल बोलत होता. पीडित मुलाला एक मुलगी पसंत होती, परंतु दोघांच्या वयात 3.5 वर्षांचे अंतर आहे. या मुलीबाबत बोलताना पीडित विद्यार्थ्याने ‘पीडोफाइल’ म्हटले.  पीडित विद्यार्थ्याने हे सांगताना एका विशिष्ट धर्मावर टिप्पणी केली. मात्र, ही चॅट दोन व्यक्तींमधील होती. पण मुलीने या संपूर्ण चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर ही बाब कळताच आरोपींनी पीडित विद्यार्थ्याचा खोलीत जाऊन त्याला मारहाण केली.

याप्रकरणी पोलिसांनी तेलंगणा रॅगिंग प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …