वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच धनुषची पूर्वश्रमीच्या पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणाला… | dhanush wrote special post for ex wife aishwarya rajanikant after her new song release


काही महिन्यांपूर्वीच ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष वेगळे झाले आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या काही महिन्यांपूर्वीच वेगळे झाले आहेत. धनुषनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून पत्नी ऐश्वर्यापासून वेगळं होत असल्याची माहिती दिली होती. या दोघांच्या नात्याची त्यावेळी बरीच चर्चा देखील झाली होती. एवढंच नाही तर दोघांच्याही चाहत्यांनाही धक्का बसला होता. मात्र धनुष आणि ऐश्वर्या यांच्या अद्याप मैत्री कायम आहे. हे त्यानं ट्विटरवर नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे समोर आलं आहे. धनुषनं त्याची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

धनुषपासून वेगळं झाल्यानंतर ऐश्वर्या रजनीकांत तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. नुकतंच तिचं नवं गाणं ‘पयानी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे. अशात धनुषनं देखील या गाण्यावर प्रतिक्रिया देत ऐश्वर्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये धनुषनं लिहिलं, ‘तुझं नवीन गाणं ‘पयानी’साठी माझी मैत्रीण ऐश्वर्या तुला खूप शुभेच्छा’

आणखी वाचा- कथित गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर हृतिक रोशनच्या आईची कमेंट, म्हणाल्या…

धनुषच्या या ट्वीटवर ऐश्वर्यानंही त्याला प्रतिक्रिया दिली आहे. धनुषचं ट्वीट रिट्विट करत ऐश्वर्यानं लिहिलं, ‘धन्यवाद धनुष, Godspeed.’ दरम्यानं वेगळं झाल्यानंतर या दोघांमध्ये असलेल्या या मैत्रीसाठी मात्र दोघांचेही चाहते खूप खूश असल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या ट्वीटवर कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :  Shraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाचं...., पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा?

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रींना काश्मिरी पंडितांची काळजी असेल तर…”, ‘द कश्मीर फाइल्स’वर करणी सेनेचं विधान चर्चेत

दरम्यान ऐश्वर्या आणि धनुष यांनी एक सलग्न स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करत आपण वेगळं होत असल्याची माहिती दिली होती. लग्नानंतर १८ वर्षांनी या दोघांनी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अद्याप दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही. मात्र त्यांच्यातील पती-पत्नीचं नातं संपल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र धनुषपासून वेगळं झाल्यानंतरही ऐश्वर्यानं सोशल मीडियावरून तिच्या नावातील धनुषचं नाव कायम ठेवलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …