वर्दीचे स्वप्न झाले पूर्ण; कृषी कन्येची पोलीस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!

MPSC PSI Success Story : आपली परिस्थिती कोणतीही असली तरी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत आणि कष्टाची तयारी हवी. असेच, फाटे कुटूंबियांनी मुलीला शेतीकाम शिकवले, हाती पेन देऊन घडवले अन् पोलिस बनण्यासाठी प्रोत्साहित देखील केले. सर्वसामान्य शेतकरी व वारकरी सांप्रदायिक कुटुंबातील कु.विद्या उत्तम फाटे ही लेक.‌ तिला लहानपणापासून वर्दीचे आकर्षण होते.‌ती वर्दी मिळवण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला. ते स्वप्न पूर्ण देखील केले. विद्या ही माळशिरस तालुक्यातील कोळेगाव गावाची रहिवासी. तिने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत गगनभरारी घेतली आहे.

विद्या फाटे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाघडोहवस्ती येथे झाले. तर आठवी ते दहावी विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव,ज्युनिअर कॉलेज सांगोला विद्यामंदिरात झाले.पुढे, महाविद्यालयीन शिक्षण सांगोला कॉलेज सांगोला ,तसेच एम.ए.सी चे शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले आहे.

या महाविद्यालयीन‌ जीवनात तिला स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली.‌त्यामुळे तिने पुणे येथे एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. तेवढ्याच कसोशीने मैदानावर तयारी देखील केली. या सर्व मेहनतीला यश आले.‌ ह २०२०मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा ईडब्लूएस प्रवर्गातून विद्या फाटे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे, तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा :  एअर इंडिया एअर सर्व्हिसेसमध्ये 495 पदांची भरती ; विनापरीक्षा होणार निवड | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …