Urfi Javed : उर्फी जावेद करतेय ‘या’ गायकाला डेट? चाहते म्हणतात… 

Urfi Javed : उर्फी जावेद करतेय ‘या’ गायकाला डेट? चाहते म्हणतात… 

Urfi Javed : उर्फी जावेद करतेय ‘या’ गायकाला डेट? चाहते म्हणतात… 

Urfi Javed Relationship : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे नाव आघाडीवर आहे. उर्फी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. चाहतेही उर्फीचा नवा लूक पाहण्यासाठी उत्सूक असतात. उर्फी आता परत चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी ती नव्या फोटोमुळे नाही तर दुसऱ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. एका गायकासोबतचा उर्फी जावेदचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवरून चाहत्यांनी उर्फी आता सिंगल राहिली नाही असा समज करून घेतला आहे.  

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उर्फीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. तिच्या त्या पोस्टला पंजाबी गायक कुंवर याने कमेंट केली होती. ‘हॅपी वी डे उर्फी जी.’ या कुवरच्या कमेंटमुळे उर्फीचे चाहते गोंधळात पडले आहेत. कुंवर याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये उर्फी आणि तो फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. कुंवरने शेअर केलेल्या या फोटोला एक कॅप्शनही दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘येथे खूप काही शिजतंय. कुंवरची ही पोस्ट उर्फी जावेदनेही आपल्या अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्याखाली तिने कॅप्शन दिले आहे की, मला माहित आहे, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? 


 उर्फी आणि कुंवर यांच्या पोस्ट व त्याखाली दोघांनीही दिलेले कॅप्शन यामुळे आता चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत. चाहत्यांच्या मते, या दोघांमध्ये काही तरी शिजत आहे? असे चाहत्यांना वाटत आहे. अनेक चाहत्यांनी या दोघांच्याही पोस्टखाली कमेंट करून, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय शिजत आहे? असे प्रश्न विचारले आहेत. एवढेच नाही तर उर्फीने आता कुंवरला डेट करायला सुरुवात केली असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.


उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी टीव्ही मालिकांमधून केली आहे. 2016 मध्ये तिने ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मालिकेत भूमिका केली होती. त्यानंतर उर्फीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय तिने बिग बॉस ओटीटीमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. याबरोबरच तिने सोशल मीडियावरी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. ती नव-नवीन लूकमधील फोटो नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.   

हेही वाचा :  मुंबई हल्ल्याबाबत आरसा दाखवल्यावर पाकिस्तानी भडकले, जावेद अख्तर म्हणतात; ''तेव्हा तर...''

महत्वाच्या बातम्याSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …