मुंबई : रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेलने याच महिन्यात 1.1 दशलक्ष आणि 0.47 दशलक्ष वापरकर्ते जोडले. Vodafone Idea (Vi) ने डिसेंबरमध्ये पुन्हा 1.6 दशलक्ष वापरकर्ते गमावले.
याचा फायदा बीएसएनएलला झाला
मार्केट शेअरच्या बाबतीत, रिलायन्स जिओकडे 36%, त्यानंतर भारती एअरटेल 30.81%, व्होडाफोन आयडिया 23%, BSNL आणि MTNL चे अनुक्रमे 9.90% आणि 0.28% आहेत.
टेलिकॉम ग्राहक बीएसएनएलकडे वळण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस खासगी दूरसंचार कंपन्यांकडून लागू करण्यात येणारी प्रीपेड दरवाढ.
जिओ सुरूवातीला खुप कमी दरात हे प्लान्स विकत होता. त्यामुळे बहुत ग्राहकांनी आपला नंबर जिओमध्ये पोर्ट केलं. परंतु आता जिओने त्याच्या प्लानची किंमत खूपच वाढवली असल्यामुळे ग्राहक नाराज झाले आहेत.
जिओसोबतच इतर कंपन्यांनी देखील आपले दर वाढवल्यामुळे लोक आता दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत. ज्यामुळे ते आता BSNLकडे वळले आहेत.
BSNL ने महिन्याभरात प्रभावीपणे जास्तीत जास्त ग्राहक जोडले. टेलिकॉम कंपनीचे 4G नेटवर्क एकदा लाइव्ह झाले की, ते अधिक परवडणारे असल्याने लोक खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा BSNLला प्राधान्य देतील याचा हा पुरावा आहे.
8.54 दशलक्ष वापरकर्त्यांनी नंबर पोर्ट पूर्ण केले
महिन्यादरम्यान, एकूण 8.54 मिलियन मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP)विनंत्या करण्यात आल्या, त्यापैकी 4.91 मिलियन रिक्वेस्ट झोन-१ मधून आल्या आणि उर्वरित 3.63 मिलियन विनंत्या झोन-२ मधून आल्या.
महाराष्ट्रात MNP झोन-1 मध्ये सर्वाधिक विनंत्या करण्यात आल्या, तर MNP झोन-2 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक MNP विनंत्या करण्यात आल्या.