शहरातील करोनाचे निर्बंध हटण्याची चिन्हे


महापालिका शासनाशी पत्रव्यवहार करणार; करोना काळजी केंद्रे लवकरच बंद

नाशिक : शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात करोना रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या १० ते १२ पर्यंत कमी करण्यात येणार आहे. शिवाय, मीनाताई ठाकरे स्टेडिअम, ठक्कर डोम येथील करोना काळजी केंद्रातील वैद्यकीय साहित्य काढून ही केंद्रेही बंद केली जाणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणारे प्रतिबंध संपुष्टात आणण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.

शहरातील करोनाचा आलेख खाली उतरला आहे. शहरात सध्या ८८ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात सध्या कुठेही करोना प्रतिबंधित क्षेत्र नाही. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे मनपा रुग्णालयातील आरक्षित खाटा कमी करण्याबरोबर करोना काळजी केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात करोना रुग्णांसाठी १० ते १२ खाटा राखीव ठेवण्याची सूचना पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली. या दोन्ही रुग्णालयांत करोनासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधितांना दोन्ही रुग्णालयांत वेगवेगळय़ा सत्रांत रुग्ण तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. मनपा रुग्णालयातील करोनासाठी राखीव खाटा कमी केल्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना तिथे उपचाराची व्यवस्था होईल. मीनाताई ठाकरे स्टेडिअम आणि ठक्कर डोम करोना काळजी केंद्र १४ मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करोना काळजी केंद्रांतील वैद्यकीय साहित्याचा लिलाव करण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे प्रतिबंधित बाबी संपुष्टात आणण्यासाठी शासनाला पत्र पाठविण्याची सूचना वैद्यकीय विभागास करण्यात आली आहे.

हेही वाचा :  अंबरनाथचे पिंपळोली हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव

घरोघरी लसीकरण

 १०० टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान राबविले जाईल. लसीकरण न झालेल्या विभागांची माहिती घेऊन त्या भागात वैद्यकीय पथकांना पाठवून घरोघरी लसीकरण केले जाणार आहे.

The post शहरातील करोनाचे निर्बंध हटण्याची चिन्हे appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता…’ पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील …

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर …