तीन मुलांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, चालकाने अचानक टर्न घेतला अन्…; धक्कादायक घटना CCTV त कैद

Viral Video: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊत (Lucknow) एका कारचालकाने तीन मुलांना कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांच्या वडिलांशी असणाऱ्या भांडणाच्या रागातून त्याने कृत्य केलं. 13 जुलै रोजी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मुलं गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

लखनऊच्या मलिहाबाद परिसरात 13 जुलै रोजी ही घटना घडली. मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र उर्फ सिताराम हा सिंधवा गावातील काझीखेडा परिसरात राहतो. सितारामची तीन मुलं शिवानी (8), स्नेहा (4) आणि कृष्णा (3) ही मार्केटमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मुलं रस्त्यावरुन जात असतानाच आरोपी गोविंदा याने त्यांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. कारने धडक दिल्याने मुलं गंभीर जखमी असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या घटनेचा 42 सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत मुलं रस्त्याच्या कडेने चालताना दिसत आहेत. यावेळी आरोपी दुसऱ्या बाजूने गाडी घेऊन जात असतो. पण मुलं दिसताच तो अचानक गाडी वळवतो आणि तिन्ही मुलांच्या अंगावर घालतो. धडक बसल्यानंतर मुलं खाली कोसळताना दिसत आहेत. 

मुलांना धडक दिल्यानंतर आरोपी गोविंदाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याची गाडी अडवली आणि पकडलं. काही वेळाने सितारामही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. 

हेही वाचा :  Maharashtra Gram Panchayat Election Result : आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती; पाहा एका क्लिकवर

पोलिसांनी आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. लखनऊ पोलिसांनी ट्वीट करतही माहिती दिली आहे. “मलिहाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर आता कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …