बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या बैठकीनंतर प्रदेशअध्यक्ष सम्राट चौधरी यांनी सर्व आमदारांना सोमवारी संध्याकाळपर्यंत बिहारमध्येच थांबण्याचा आदेश दिला होता. तर, एकीकडे बिहार सचिवालयाची सुट्टीदेखील रद्द करण्यात आली होती. त्यामुळं येत्या दोन दिवसांत बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचा अंदाज बांधला जात आहे. 

28 जानेवारी म्हणजेच सोमवारी सकाळी 10 वाजता जेडीयू विधानमंडळ गटाची बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात एनडीए विधानमंडळ दलाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर दुपारी 12 वाजता राज्यपालांची भेट घेऊन नीतीश कुमार त्यांचा राजीनामा देऊ शकतात. त्याचबरोबर एनडीएच्या आमदारांचे समर्थन असलेले पत्रदेखील राज्यपालांना सोपवण्यात येईल. त्यानंतर 4 वाजता शपथग्रहण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

हेही वाचा :  लग्नात तरुणाचा डान्स आवडला नाही, नवरदेवाच्या भावाने वरातीतच... धक्कादायक घटना

नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री

नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर एक नजर

– 3 मार्च 2000
– 24 नोव्हेंबर 2005
– 26 नोव्हेंबर 2010
– 22 फेब्रुवारी 2015
– 22 नोव्हेंबर 2015
– 27 जुलै 2017
– 16 नोव्हेंबर 2020
– 9 ऑगस्ट 2022 

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर काय?

नीतीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या साथीने पुन्हा एखदा सरकार बनवण्याचा दावा करणार. नव्या सरकारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील तर, त्यांच्यासोबत भाजपचे दोन नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्यासोबत आधीच्या सरकारमध्ये सहकारी असलेले सुशील मोदी आणि रेणू देवी यांच्याजवळ उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात येईल. 

जागांचे गणित काय?

आरजेडीच्या आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 8 आमदारांचे समर्थन गरजेचे आहे. विधानसभेसाठी 243 सदस्य आहेत. त्यातील 78 जेडीयू आणि भाजप 45 आमदार आहेत. ही एखूण संख्या 123 इतकी आहे. बहूमताचा आकडा गाठण्यासाठी 122 जागांची गरज आहे. 

हेही वाचा :  'सरकारी नोकर आहे, तुमची नाही,' महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले 'तुझी आता...'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …