कल्याणहून ठाणे व नवी मुंबईत पोहोचणे सोप्पे होणार; वाहतूक कोंडीही फुटणार!

Shilphata Flyover: कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. ह.भ.प.संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळं शिळफाटा चौकातला प्रवास अधिक सुस्साट होणार आहे. कल्याण शीळ मार्गावरुन कल्याण, डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई प्रवास कोंडीमुक्त आणि अधिक वेगवान होणार आहे. (Shilphata Flyover Update)

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे व नवी मुंबईचा जाण्यासाठी शीळ मार्ग हा महत्त्वाचा आहे. मात्र, या मार्गावर नेहमी वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहा पदरीकरण करुन येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता. तसंच, या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील शिळफाटा जंक्शन येथील सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित सहा मार्गिका आता खुल्या करण्यात आल्या आहेत. 

फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या. यावरुन दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू होती. या पुलामुळं बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळ मार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणे सोप्पे होणार आहे. तसंच, नागरिकांची वाहतुक कोंडीतून सुटकादेखील होणार आहे. उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्याने चालकांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

हेही वाचा :  नोकरदारांनो सावधान! कार्यालये, आस्थापनांच्या नाम पट्ट्या वाहनाच्या दर्शनी भागात लावल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई

शीळफाटा सहापदरी उड्डाणपुलाचे वैशिष्ट्यै काय

– एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.

– ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असा हा उड्डाणपूल आहे.

– या पुलामुळे शिळफाट्याची वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

साहेब माझ्या पत्नीवर रेप झालाय, पतीच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष, तरुणाने उचलले भयंकर पाऊल

Trending News In Marathi: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एक …

‘यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल, पण..’; निकालापूर्वीच पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावूक आवाहन

Gopinath Munde Death Anniversary : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा येत्या 3 जून रोजी दहावा स्मृतीदिन …