RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी

RPF Bharti: रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 15 एप्रिलपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफ अंतर्गत एकूण 4660 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरपीएफ अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार ही पदे भरली जातील. 

पगार

उपनिरीक्षकची 452 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. यासाठी अर्ज करणारा उमेदवार 20 ते 28 वर्षांदरम्यानचा असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 35 हजार 400 पर्यंत पगार दिला जाणार आहे.

कॉन्स्टेबलची 4208 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. यासाठी अर्ज करणारा 18 ते 28 वर्षांदरम्यान असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 21 हजार 700 पर्यंत पगार दिला जाणार आहे.

हेही वाचा :  मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

अर्ज शुल्क

अर्जदारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तर एससी, एसटी, महिला, मागासवर्गीय उमेदवारांकडून 250 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना उमेदवाराला वयाचा पुरावा म्हणून मॅट्रिकचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/मॅट्रिक प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, सेल्फ अटेस्टेड फोटोच्या दोन प्रती, सरकारची सेवा करत असल्यास सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र, लागू असल्यास अधिवास प्रमाणपत्र, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी संबंधित प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. 

अर्ज शुल्क

कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), फिजिकल इफिशन्सी टेस्ट (PET), फिजिकल मेझरमेंट टेस्ट (PMT) आणि कागदपत्र पडताळणी या माध्यमातून ही निवड केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्या 

अर्जाची शेवटची तारीख

14 मे 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणारआहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …