स्मोकी बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? ‘ही’ आहे संपूर्ण कहाणी

लहान मुलांना आकर्षित करणं अतिशय सोपं असतं. मॉल आणि जत्रेमध्ये मुलांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार नाना प्रकारच्या गोष्टी करतात. त्यातील एक स्मोकी पदार्थ…हे तुम्ही पाहिलं पण असेल किंवा यांचे व्हिडीओ पाहिले असतील. स्मोकी आइस्क्रीम, स्मोकी पान आणि सगळ्यात प्रसिद्ध स्मोकी ड्रिंक…(child smokey biscuit eating toddler really dead This is the whole story Viral Video Fact Check)

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एका जत्रेत स्मोकी बिस्किट खाल्ल्यानंतर तो मुलगा वेदननं विव्हळतोय. त्याच्या मदतीला काही लोक धावतात. पालक त्याला पाणी देतात पण तो अस्वस्थ झालेला पाहिला मिळतो. हा व्हिडीओ विचलित करणारा असल्याने आम्ही तो दाखवू शकतं नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. 

smokeybiscuit1

धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ शेअर करताना पालकांना सतर्क राहा आणि स्मोकी बिस्किटमुळे या मुलाचा मृत्यू झाला दावा केलाय. शिवाय अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांवर बंदी करण्याचं आवाहन यात करण्यात आले आहे. 
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ही घटना तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशातील असल्याचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या एका पोस्टमध्ये असं लिहिलंय की, ”पाहा कसं Dry Ice खातो आणि काही क्षणात तो जगाचा निरोप घेतो.” दरम्यान हा व्हिडीओ फेसबुक आणि एक्सवर व्हायरल होत असलून लोक त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे.

हेही वाचा :  धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO

smokeybiscuit2

 

‘या’ चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? 

या व्हिडीओचा फॅक्ट चेक करण्यात आला आणि हा मुलगा स्मोकी बिस्किट खाऊ त्याचा मृत्यू झाल्याच सत्य तपासण्यात आला. त्यात असं आढळून आलं की, ही घटना नुकतीच कर्नाटकातील दावणगेरे या गावातील आहे. 
रिव्हर्स सर्चच्या मदतीने हा क्लू आणि व्हिडीओचा कीफ्रेम शोधल्यावर असं धक्कादायक घटना समोर आली. फॅक चेकमध्ये 18 एप्रिल 2024 ला कन्नड भाषेत प्रकाशित झालेली एक बातमी समोर आली. या बातमीत व्हायरल झालेल्या व्हिडीओची माहिती देण्यात आली होती. यात असं सांगण्यात आलं होतं की, दावणगेरेमधील एका प्रदर्शनात ही घटना घडली.

ज्यामध्ये स्मोकी बिस्किट खाल्ल्यानंतर मुलाची तब्येत अस्वस्थ झाली. या घटनेनंतर तात्काळ चिमुकल्याला पालकांनी जवळच्या रुग्णालयात नेलं आणि त्यावर उपचार करण्यात आले. या उपचारानंतर हा मुलगा बरा होऊन घरी गेल्याच सांगण्यात आलंय. 

स्मिकी पदार्थ बनवण्यासाठी कोरड्या बर्फ किंवा नायट्रोजन द्रवाचा वापर करण्यात येतो. हे बिस्किट खाल्ल्यानंतर तोंडातून धूर निघतो. दरम्यान घटनेचा व्हिडीओ पाहून पोलिसांनी पालकांशी संपर्क साधला मात्र त्यांनी तक्रार करण्यास मनाई केली. तरीदेखील त्या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आणि दुकान बंद करण्यात आलंय. शिवाय या घटनेबद्दल अन्न विभागालाही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :  Video: महाराष्ट्रात तुरी जास्त म्हणून औरंगजेबाला दिल्या; विद्यार्थ्यांची उत्तरे ऐकून डोक्याला हात माराल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …