कोरोनापेक्षाही ‘या’ भयंकर आजारामुळे दररोज 4400 लोकांचा बळी, कुठे वाढलाय धोका?

Covid 19 Update :  कोरोना संकटातून जग आता कुठे सावरत आहे. कोरोनाचा (Coronavirus Update) धोकी ही कमी झाला असताना, आता नवं संकट जगासमोर उभे ठाकले आहे. हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. या आजारामुळे दिवसाला 700 मुलांसह सुमारे 4,400 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हा आजार कोरोनातून बरे झालेल्यांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनाच येत आहे.. तरीही जगभरात सार्वधिक जीवघेण्या असलेल्या गंभीर अशा आजाराकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. 

जगभरात कोरोनापेक्षाही सार्वधिक जीवघेणा आजार आहे तो म्हणजे क्षयरोग (टीबी). ट्यूबरकोलॅसिस (tuberculosis) म्हणजेच टीबी बॅक्टेरिया आजारी व्यक्तीच्या शरीरात सहज प्रवेश करू शकतात. सामान्य सर्दी किंवा खोकल्याप्रमाणे हे बॅक्टेरिया शरीराल इंफेक्ट करत निरोगी व्यक्तीला आपल्या जाळ्यात घेतात. दरदिवशी या आजारामुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी जगातील एकून टीबी रुग्णांपैकी एक तृतीयांश भारतात असतात.  भारतात दरवर्षी 480,000 लोकांचा टीबीमुळे मृत्यू होतो. भारत सरकारच्या अंदाजे आकडेवारीनुसार, टीबी देशात दररोज 1,300 लोकांचा बळी घेतो. तर दुसरीकडे युनायटेड नेशन्सचे शीर्ष अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार टीबी हा आजार कोरोना आणि एड्सपेक्षाही (Corona and AIDS ) गंभीर असल्याचे म्हटले आहे.  युक्रेन आणि सुदान सारख्या देशांमध्ये टीबीचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहेत.

हेही वाचा :  Covid 19 : राज्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आली दोन हजारांपेक्षा खाली ; रिकव्हरी रेट ९७.६६ टक्के

परदेशात अधिक रुग्ण

टीबी हा आज जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य रोग असून या आजारामुळे दररोज 700 मुलांसह सुमारे 4,400 लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत स्टॉप टीबी पार्टनरशिपचे कार्यकारी संचालक डॉ. लुसिका डिटीयू यांनी सांगितले की, टीबी हा आजार हवेतून लोकांमध्ये पसरत आहे. तसेच टीबीचा रुग्ण जेव्हा शिंकतो, खोकतो, हसतो किंवा गातो तेव्हा तो हवेच्या थेंबाद्वारे पसरतो. हा आजार युक्रेनमध्ये युरोपियन प्रदेशात टीबी असलेल्या लोकांमध्ये सार्वधिक आहे. 

कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत?

राज्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र क्षयरोगाने सर्वाधिक प्रभावित आहेत. उत्तर प्रदेशात 20 टक्के, महाराष्ट्रात 9 टक्के रुग्ण आढळले आहेत. तर मध्य प्रदेशात 8 टक्के, राजस्थान आणि बिहारमध्ये प्रत्येकी 8 टक्के रुग्ण आढळले आहेत. 

टीबीचे मुख्य रिस्क फॅक्टर्स

कुपोषण, मद्यपान, धूम्रपान, मधुमेह आणि एचआयव्ही हे 5 प्रमुख जोखीम घटक आहेत.

क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास काय करावे?

  • जर तुम्हाला 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ जुलाब होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. ही लक्षणे लपवू नयेत अथवा त्याकडे दुर्लक्ष करु नयेत. 
  • खोक्ताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवा
  • औषध कोर्स पूर्ण करा.
  • भरपूर पौष्टिक तत्वे असलेला आणि चौरस आहार घ्या.
  • सिगारेट, हुक्का, तंबाखू आणि दारू यापासून लांब राहा. 
हेही वाचा :  मान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये 'या' दिवशी दाखल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …

‘इतकी प्रगती सुद्धा चांगली नाही’ या देशात लावण्यात आली अशी व्हेंडिंग मशीन… लोकं संतप्त

China Vending Machine : जगाने गेल्या काही वर्षात खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, वैद्यकीय, अॅग्रो …