‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांची पसंती; भारतात कधी होणार रि

The Legend of Maula Jatt: ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend of Maula Jatt) हा पाकिस्तानी चित्रपट सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज झाला.  ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 220 कोटींची कमाई केली आहे. 

UK मध्ये, 1.39 दशलक्ष कमाई केल्यानं हा चित्रपट पद्मावतनंतर 2018 चा दक्षिण आशियातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. नॉर्वेमध्ये देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली. गल्फ,अमेरिका आणि यूरोप या देशांमधील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं धुमाकूळ घातला. ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटातील फनाद खानच्या अभिनयाचं अनेक लोक कौतुक करत आहेत. 

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट 1979मध्ये आलेल्या युनुस मलिक दिग्दर्शित ‘मौला जट’ चित्रपटाचा रिमेक आहे. फवाद खानच्या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला 51 कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले.  ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट 25 देशांमध्ये सुमारे 500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :  सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ भारतात कधी रिलीज होणार? 

News Reels

रिपोर्टनुसार, हा चित्रपट 23 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.यापूर्वी फवाद खान आणि माहिरा खान यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते भारतातही खूप लोकप्रिय आहेत. त्यांची ‘हमसफर’ ही प्रसिद्ध मालिकाही येथे हिट झाली होती.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Fawad Khan, Maula Jatt : अभिनेता फवाद खानच्या ‘मौला जट’ चित्रपटाचा पाकिस्तानी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; परदेशातही चित्रपट ठरतोय लोकप्रिय!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …