सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Supreme Court : चित्रपट (Movie) पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपगृहात (Movie Theater) जातात. चित्रपगृहात चित्रपट बघताना पॉपकॉर्न (Popcorn), समोसा असे खाद्य पदार्थ लोक खातात.  याच खाद्य पदार्थांसंबंधित एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे.  भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court)  खंडपीठाने 3 जानेवारी रोजी नमूद केले की, ‘सिनेमा हॉल ही थिएटर मालकांची मालमत्ता आहे. त्यामुळे चित्रपट बघायला जाताना प्रेक्षक अन्न आणि पेय थिएटरमध्ये घेऊन जाऊ शकतात की नाही? याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे.’

जम्मू-काश्मीरमधील सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स मालकांनी केली याचिका
जम्मू-काश्मीरमधील सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्सच्या (Multiplex) मालकांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली.  याचिकाकर्त्यांनी 2018 मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.  उच्च न्यायालयाने सिनेमागृहात येणारे लोक बाहेरून खाद्यपदार्थ आणू शकतात, असा आदेश दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा तो निर्णय रद्द केला.

न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांनी सांगितले की, “थिएटरच्या मालकांना थिएटरमध्ये अन्न आणि पेये विकण्याचा अधिकार आहे.”

हेही वाचा :  राम चरण आणि उपासनाच्या घरी होणार चिमुकल्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

‘सिनेमा हॉलची मालमत्ता ही थिएटरच्या मालकाची खाजगी मालमत्ता आहे. जोपर्यंत त्यांचे नियम  सार्वजनिक हित, सुरक्षितता आणि कल्याणाच्या विरुद्ध नसतील तोपर्यंत थिएटर मालकांच्या नियमांचा विरोध केला जाऊ शकत नाही. थिएटर  मालकाला अन्न आणि पेये यांच्या विक्रीसंबंधित कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आहे. चित्रपट पाहणाऱ्याला ते खरेदी न करण्याचा पर्याय आहे.’ असंही कोर्टानं म्हटलं. 

live reels News Reels

 चित्रपटगृह मालकांना सर्व प्रेक्षकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा देण्याचे निर्देश दिले. लहान मुले आणि मुलांसह पालकांना थिएटरमध्ये वाजवी प्रमाणात अन्न घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, असंही खंडपीठाने सांगितले.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 4 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

 

 

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …