सुखी संसार फक्त दिखावा? ‘या’ कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील ‘हे’ शहर आघाडीवर

Relationship News : प्रेम, वैवाहिक नातं आणि सुखी संसार या संकल्पना अनेकदा ‘छान चाललंय’, ‘मस्त चाललंय आमचं’ वगैरे वाक्यांमध्ये व्यक्त केल्या जातात. एखाद्या वैवाहिक व्यक्तीला कैक दिवसांनंतर भेटताच ‘कसं चाललंय आयुष्य?’ असा प्रश्न केला असता सहसा त्यांच्याकडून ही अशीच, थोडक्यात एकाच पठडीतील उत्तरं मिळतात. पण, प्रत्यक्षात मात्र तसं नसतं! 

एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठे घटक पती पत्नीच्या नात्यावर थेट परिणाम करताना दिसतात. ज्यामुळं पुढं नात्यात एकमेकांची फसवणूक करत जगासमोर मात्र सर्वकाही आलबेल आहे असंही भासवलं जातं. पैशांची हाव किंवा सततचा वाढता मोह, सोशल मीडियावरील विचलित करणारी माहिती, अश्लीलता, इंटरनेटचा टाळता न येण्याजोगा वापर आणि पाश्चिमात्य संस्कृती या आणि अशा इतरही कारणांमुळं कैक वर्षांपासून सुखी संसार करणारी जोडपी एकमेकांची फसवणूक करतात. 

अहवालातून समोर आले धक्कादायक संदर्भ 

आशियाई आणि युरोपातील राष्ट्रांसह भारतात करम्याच आलेल्या निरीक्षणानुसार लग्नानंतर साधारण सात वर्षांनी स्त्रिया या नात्यात ‘चौकटीबाहेरचे विचार’ करु लागतात. तर, पती लग्नाच्या तिसऱ्यात वर्षात नात्याला एक वेगळा फाटा फोडण्याचा विचार करु लागतात. डेटा एजन्सी बेडबायबल रिसर्च सेंटर 2023 च्या अहवालानुसार 23 टक्के जोडपी एकमेकांना कोणत्या न कोणत्या मुद्द्यांवर फसवत आहेत. त्यातील 14 टक्के संख्या अशी आहे ज्यांनी ही फसवणूक मान्यही केली आहे. यामध्ये 21 टक्के पुरूष आणि 7 टक्के महिलांचा समावेश आहे. 

हेही वाचा :  12 वी पास असाल तर Government Job ची सुवर्णसंधी! लेखी परिक्षेशिवाय निवड, पगार 81000/ महिना

प्रेमात फसवणूक, वय, शारीरिक बदल, शिक्षण किंवा फक्त फसवणूक अशा मूल्यांशी ही फसवणूक संबंधित आहे. भारताची आकडेवारी पाहायची झाल्यास देशातील बंगळुरू भागात पती- पत्नीच्या नात्यात सर्वाधिक फसवणूक होते असं आकडेवारी सांगते. त्यामागोमाग मुंबई आणि कोलकाता या शहरांची नावं पुढे येतात. 

 

वयाचा आकडा विचारात घ्यायचा झाल्यास देशात सरासरी 19 ते 29 वर्षे वयोगटातील महिलांकडून पुरुषांच्या तुलनेत जास्त फसवणूक केली जाते. या वयात हे प्रमाण 40 टक्के असून, पुरुषांमध्ये हे प्रमाण फक्त 21 टक्के इतकंच आहे. 

कोणकोणत्या देशांमध्ये फसवणूक म्हणजे गुन्हा? 

वैवाहिक नात्यात असतानाही विवाहबाह्य संबंध ठेवणं हा एक गुन्हा असल्याचा कायदा अनेक देशांमध्ये लागू आहे. इंडोनेशियामध्ये हे कृत्य गुन्हेगारीमध्ये गणलं जातं, तर अफगाणिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स, सोमालियामध्ये विवाहबाह्य संबंध शिक्षेस पात्र आहेत. अमेरिकेतील काही प्रांतांमध्येसुद्धा विवाहबाह्य प्रेमसंबंध गुन्ह्यास पात्र आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …