TATA कंपनीचे स्पाय सॅटेलाईट थेट अमेरिकेतून अवकाशात झेप घेणार; भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती

TATA TASL – Tata Advanced Systems Limited : TATA कंपनीने आता थेट स्पेस सेक्टरमध्ये उडी घेतली आहे. TATA कंपनीने मिलीटरी दर्जाचे स्पाय सॅटेलाईट विकसीत केले आहे. हे स्पाय सॅटेलाईट भारतीय सुरक्षा यंत्रेणेला  गुप्त माहिती देणार आहे. यामुळे भारतीय सुरक्षाव्यवस्था आणखी अभेद्य होणार आहे.  SpaceX रॉकेटच्या मदतीने हे   स्पाय सॅटेलाईट प्रेक्षेपित करण्यात येणार आहे.

Tata ग्रुपच्या TASL अर्ताथ टाटा एडवांस सिस्टम्स लिमिटेड कंपनीने (Tata Advanced Systems Limited) हे स्पाय सॅटेलाईट तयार केले आहे. भारतीय सैन्याच्या मदतीसाठी हे स्पाय सॅटेलाईट तयार करण्यात आहे. हे स्पाय सॅटेलाईट शत्रुवर नजर ठेवणार आहे तसेच भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती देखील उपलब्ध करुन देणार आहे. 

अमेरिकेतून होणार स्पाय सॅटेलाईटचे लाँचिंग

थेट अमेरिकेतून हे  स्पाय सॅटेलाईट अवकाशात झेपावणार आहे. या स्पाय सॅटेलाईटचे सर्व पार्ट अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या स्पेस सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहेत. या स्पेस सेंटरमध्ये टाटाच्या स्पाय सॅटेलाईटचे सर्व पार्ट एकमेकांना जोडण्यात येईल. यानंतर एलन मस्क यांच्या  SpaceX रॉकेटच्या मदतीने टाटाच्या स्पाय सॅटेलाईटचे लाँचिंग केले जाणार आहे. एप्रिल महिन्यात टाटाच्या स्पाय सॅटेलाईटचे लाँचिंग केले जाणार आहे. मात्र, याच्या लाँचिंगची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 

हेही वाचा :  Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी

टाटाच्या स्पाय सॅटेलाईटचा कंट्रोलरुम भारतात

टाटाचे हे स्पाय सॅटेलाईट अमेरिकेतून अवकाशात झेपावणार असले तरी याची कंट्रोलरुम भारतात असणार आहे. बेंगळुरूमध्ये याचे ग्राउंड कंट्रोल सेंटर तयार करण्यात आले आहे. स्पाय सॅटेलाईट मार्फत पाठवला जाणार सर्व डेटा हा बेंगळुरूमधील ग्राउंड कंट्रोल सेंटरमध्येच अभ्यासला जाणार आहे. 

स्पाय सॅटेलाईटचा भारतीय सुरक्षा यंत्रणेला नेमका काय फायदा होणार?

स्पाय सॅटेलाईटचा भारतीय सुरक्षा यंत्रणेला गुप्तहेरीसाठी मोठा फायदा होणार आहे. सध्या काही गुप्त माहिती पाहिजे असल्यास भारतीय सुरक्षा यंत्रणांना इतर देशांच्या स्पाय सॅटेलाईटची मदत घ्यावी लागते. मात्र, टाटाच्या स्पाय सॅटेलाईटमुळे भारत स्वावलंबी होणार आहे.   या उपग्रहाचा वापर भारतीय सैन्याकडून केला जाणार आहे. या उपग्रहामध्ये 0.5 मीटर अवकाशीय रेझोल्यूशन आहे. अत्यंत गुप्त माहिती भारतीय सैन्याला मिळवता येणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) कडे देखील असे उपग्रह आहेत. मात्र, यांना काही मर्यादा आहेत. यामुळे टाटाने हे स्पाय सॅटेलाईट विकसीत केले आहे. नियंत्रण रेषेवरून चीनशी सुरु असलेल्या संघर्षामुळे अशा प्रकारच्या सॅटेलाईटची भारतीय सुरक्षा यंत्रणांना गरज आहे.  टाटाच्या स्पाय सॅटेलाईटमधून मिळालेली छायाचित्रे तसेच डेटा गरज असल्यास इतर देशांना देखील उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 

हेही वाचा :  आता फक्त 101 दिवसांची प्रतिक्षा; इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …