टी-20 मालिकेत कोणाचं पारडं जड? काय सांगताय हेड टू हेड रेकॉर्ड

टी-20 मालिकेत कोणाचं पारडं जड? काय सांगताय हेड टू हेड रेकॉर्ड

IND Vs SL T20: वेस्ट इंडीजच्या संघाला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंकेशी भिडणार आहे. भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ तीन सामन्यची टी-20 मालिका आणि दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टी-20 मालिकेत आतापर्यंत कोणत्या संघाचं पारडं जडं रहिलंय? यावर एक नजर टाकुयात.

विजयाची टक्केवारी
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 14 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे. भारताची विजयाची टक्केवारी 66.66 इतकी आहे. तर, श्रीलंकेच्या संघाची विजयाची टक्केवारी 33.33 इतकी आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरची टी-20 मालिका
श्रीलंकेनं 2021 मध्ये तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारताला 2-1 च्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेच्या संघाला 38 धावांनी पराभूत केलं. परंतु, अखेरच्या दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला. श्रीलंकेच्या संघानं दुसरा सामना 4 विकेट्स आणि तिसरा सामना 7 विकेट्सनं जिंकला होता.

भारत- श्रीलंका कुठे खेळले जाणार?
आता श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. भारता आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी

हे देखील वाचा-

Wriddhiman Saha : वृद्धिमानला मिळालेल्या धमकीवर BCCI चं हस्तक्षेप, लेखी तक्रारीवर होणार कायदेशीर कारवाई?

IND vs WI : वेंकटेश अय्यरची टीम इंडियात स्थान पक्कं? कोच राहुल द्रविड म्हणतो…

Indian Women Cricket Team: भारतानं गेल्या 12 महिन्यात 4 एकदिवसीय मालिका गमावल्या, उद्या न्यूझीलंडविरुद्ध चौथा सामना खेळणार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

हेही वाचा :  पिंक बॉल कसोटीत आतापर्यंत किती शतकं झळकली? यादीत एकमेव भारतीय खेळाडू

Source link