पोलार्डसह डॅनियल सॅम्स, उनाडकट सारख्या स्टार्सना मुंबईचा अलविदा, वाचा सविस्तर यादी

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबई पूर्णपणे नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लिलावासाठी मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असून पोलार्ड सारख्या दिग्गज खेळाडूलाही संघानं अलविदा केलं आहे. तर मुंबईने कोणते खेळाडू रिलीज आहेत आणि कोणते खेळाडू अद्याप संघात आहेत ते जाणून घेऊया.

मुंबईनं रिलीज केलेले खेळाडू

कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बेसिल थंपी, डॅनियल सायम्स, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स.

कोणते खेळाडू अजूनही मुंबई इंडियन्समध्ये

Reels

रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल


 

हेही वाचा :  जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत खेळांचे आयोजन

IPL 2023 साठी कशी असेल मुंबईची रणनीती?

मुंबई लिलावात 20.55 कोटी रुपये घेणार असून एक मिनी ऑक्शनसाठी ही रक्कम एक मोठी रक्कम आहे. पण आयपीएल 2022 मधील अनुभव पाहता मुंबईला खेळाडूंच्या निवडीत हुशारी दाखवावी लागणार आहे. सध्या त्यांच्याकडे तीन परदेशी खेळाडूंसाठी जागा आहे. भारतीय खेळाडूंसाठीही बरीच जागा असून लिलावात मुंबईला चांगले मधल्या फळीतील फलंदाज आणि फिनिशर खेळाडू शोधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यात पोलार्डची जागा भरून काढणं सोपं काम नसणार आणि गोलंदाजीतही फिरकीपटू मुंबईला गरजेचे आहेत.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …