स्मार्ट इग्नू हॅकाथॉनच्या नोंदणीची अंतिम तारीख वाढवली

Smart IGNOU Hackathon 2022: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University,IGNOU) स्मार्ट इग्नू हॅकाथॉन २०२२ साठी नोंदणी आणि प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२२ (Smart IGNOU Hackathon)चा एक भाग आहे.

एसआयएच २०२२ साठी टीम निवडण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी इग्नू फेब्रुवारी-मार्च २०२२ दरम्यान अंतर्गत हॅकाथॉन म्हणून स्मार्ट इग्नू हॅकेथॉन २०२२ चे आयोजन करत आहे. इच्छुक विद्यार्थी स्मार्ट इग्नू हॅकाथॉन २०२२ मध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल.

फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार्‍या इन-हाउस स्मार्ट इग्नू हॅकाथॉन २०२२, निवडलेल्या संघांना एसआयएच २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठाकडून नामनिर्देशित केले जाईल. इग्नूचे सर्व विद्यार्थी स्मार्ट इग्नू हॅकाथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रत्येक संघात कॉम्प्युटर सायन्सची पार्श्वभूमी असलेले विविध विषयांचे विद्यार्थी, एमसीए आणि बीसीए इत्यादी सदस्य असू शकतात. हॅकाथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

CBI Recruitment 2022: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
हॅकाथॉन २०२२ चा अधिक तपशील SIH वेबसाइटवर दिले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना SIH च्या निकषांनुसार एक टीम तयार करावी लागेल. उमेदवारांनी आपल्या समस्यांची माहिती २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एसआयएच समन्वयकांकडे सोपवावी लागणार आहे. निवडलेल्या संघांना व्हर्च्युअल पद्धतीने इग्नू हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल.

हेही वाचा :  कमी किंमतीत घर बांधणी शक्य, IIT Madras कडून तंत्राचे संशोधन

Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
इच्छुक विद्यार्थी आपला तपशील [email protected] या ईमेलवर पाठवायचा आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वास्तविक जीवनातील समस्या आणि विविध सहभागी मंत्रालये आणि विभागांसमोरील आव्हाने सोडवतात आणि सरकारला मदत करुन बक्षिसे जिंकतात. ४५ हून अधिक मंत्रालये आणि विभागांनी समस्या विधाने जाहीर करण्यात आली आहेत. शाळा आणि महाविद्यालय एसपीओसी नोंदणी २६ मार्चपर्यंत खुली आहे.

Government Job: एचपीसीएलमध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …