हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक बातमी, कुरुलकर यांचा शासकीय पासपोर्टवर 5 ते 6 देशांचा दौरा

Pradeep Kurulkar Honey Trap Case : हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले  डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. मात्र त्यात नेमके काय संभाषण झाले हे अद्याप समोर आलेले नाही, असे एटीएसने म्हटलेय.

गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांची भेट

डॉ. प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत होते. त्यांच्याकडे दोन पासपोर्ट असून त्यांनी शासकीय पासपोर्ट वापरून 5 ते 6 देशांत दौरा केल्याचंही तपासात उघड झाले आहे. हा दौरा त्यांनी कशासाठी केला, दौ-या दरम्यान कोणाच्या भेटी घेतल्या याचा तपास आता करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष न्यायालयानं कुरुलकर यांना 15 मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाबाबत आणखी धक्कादायक माहिती, पाकिस्तानात…

देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही फोटो शेअर केले…

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाबाबत आणखी धक्कादायक माहिती, पाकिस्तानात...

दरम्यान, मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. मात्र त्यात नेमके काय संभाषण झाले हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही फोटो शेअर केले आहेत. 2022 मध्ये कुरुलकर यांनी पाच ते सहा देशांना शासकीय पासपोर्ट वापरत भेट दिली आहे. तेथे ते कोणाला भेटले याची माहिती घेतली जात आहे. तपासादरम्यान काही नावे पुढे आली आहेत, अशी माहिती एटीसएच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली आहे.

हेही वाचा :  Saas Bahu Aur Flamingo चा ट्रेलर प्रदर्शित... डिंपल कपाडियाचा कधीही न पाहिलेला अवतार...

 पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपानंतर अटक

शास्त्रज्ञ प्रदीप  कुरुलकर मेसेजिंग अ‍ॅपद्वारे व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे “पाकिस्तान इंटेलिजेन्स ऑपरेटिव्ह”च्या एजंटच्या संपर्कात होते. पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन त्यांना एटीएसने अटक केली आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन, शत्रू देशाला आपल्या ताब्यातील अधिकृत गुपिते दिलीत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, हे माहीत असूनही, संवेदनशील तपशील शत्रू देशाला बेकायदेशीरपणे प्रदान केला, अशी एटीएसने आरोप ठेवताना म्हटले आहे.

कुरुलकर यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. एटीएसने केलेल्या तपासाची माहिती देत कुरुलकर यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार पुढील तपासासाठी न्यायालयाने कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीत 15 मेपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, कुरुलकर यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. याबाबत फॉरेंसिक रिपोर्ट मंगळवारी न्यायालयात दाखल करण्यात आला होता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …