खंडेरायाच्या जेजुरीतील धक्कादायक घटना; बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या; पण 2 तासातच…

Pune Crime : खंडेरायाच्या जेजुरीत धक्कादायक घटना  घडली आहे. बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या केली. अनैतिक संबंधातुन तिने पतीचा खुन केला. मात्र, दोन तासात पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणामुळे जेजुरीत एकच खळबळ उडाली आहे. 

नीरा नजीक पिंपरे खुर्द येथे झालेल्या खून प्रकरणाचा छडा जेजुरी पोलिसांनी अवघ्या दोन तासात लावलाय. शुक्रवारी रात्री हरिश्चंद्र बजरंग थोपटे  (वय 42 वर्षे ) यांचा तलवार आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे मयत थोपटे यांच्या पत्नीचा देखील या खूनामध्ये सहभाग असल्याचं तपासात उघड झाले. 

प्रणव राजेंद्र ढावरे (वय 23) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. प्रणव याच्या मदतीनेच मृताची पत्नी पुजा हरीशचंद्र थोपटे (वय 30 वर्षे) हीने हरिश्चंद्र बजरंग थोपटे याची सुपारी देऊन हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.  धीरज उर्फ बंटी संजय चावरे (वय 24 वर्षे), निकेश विरेंद्र सिंह ठाकुर  ( वय 20 वर्षे ) सिध्दात संभाजी भोसले (वय 25 वर्षे), सुरेश कांतीलाल कडाळे (वय 25 वर्षे) पान  लखन बाळाजी सूर्यवंशी (वय 24 वर्षे), स्वरूप रामदास जाधव (वय 21 वर्षे),  विशाल रूपचंद चव्हाण ( वय 20 वर्षे) आणि  शुभ चिन मयारे (वय 19 वर्षे) अशी इतर अटक आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा :  अर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...

सतिश बजरंग थोपटे यांनी या घटनेची पोलीसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश्चंद्र बजरंग थोपटे (वय 42 वर्षे ) हे पिंपरे खुर्द येथील बेंदवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले होते. त्यांच्या चेह-यावर, कपाळावर, हनुवटीवर, गळ्यावर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या. अज्ञाताने अज्ञात कारणासाठी वार करून त्यांचा खुन केला असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता. मयत थोपटे हे ज्युबिलंट कंपनीत गेल्या 20 वर्षापासुन हमालीचे काम करत होते. 

कल्याण मध्ये पाच बांगलादेशी महिला अटक

कल्याण महात्मा फुले पोलिसांना काही बांग्लादेशी महिला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून त्यांना पोलिसांनी अटक केली. यात एक अल्पवयीन बांग्लादेशी तरुणी आहे.या महिलांची चौकशी करत असताना त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी भाषा कळत नसल्याने दुभाषकाची मदत घेत या महिलांकडून त्या कुठून आल्या? त्या कोण आहेत?याची माहिती घेतली. त्या चौकशीत बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी या चौघींना इथे बोलावणारी आखी अख्तर हिला देखील अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आखी अख्तर ही गेल्या चार वर्षापासून रितीका सिंग असे नाव बदलून मुंबईच्या माहीम मध्ये राहत होती. डोंबिवली मानपाडा परिसरात राहणाऱ्या रघूनाथ मंडल याच्यासोबत तिने स्वत:ची ओळख लपवून लग्न केले. शिवाय बनावट कागदपत्रांच्या आधारे रितीका रघूनाथ मंडळ या नावाने आधार आणि पॅनकार्ड तयार केले. गेल्या सहा महिन्यापासून डोंबिवली मानपाडा परिसरात ती राहत होती. तिने या चार मुलींना बांग्लादेशातून या ठिकाणी आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. लूथफा आलाम, जोरना अख्तर, मासूमा जोमीरउद्दीन या तिघींसह अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांना आश्रय देणाऱ्या रघूनाथ आणि त्याची पत्नी रितिका उर्फ आखी अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बांग्लादेशी महिला भारतात कोणत्या कारणासाठी आल्या. त्यांना येण्यासाठी कोणी मदत केली का, त्यांच्यासोबत अन्य कोणी आले आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :  ढोल ताशा पथकात जातो म्हणून पुणेकर आजीची नातवाला पाईपने मारहाण; पुण्यातील अजब प्रकार

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …