शिखर धवनला पत्नी आयशाकडून ‘मानसिक क्रूरता’ या मुद्द्यावर मिळाला घटस्फोट? कायद्यानुसार क्रूरतेचे प्रकार कोणते?

Shikhar And Ayesha Divorce : शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी आता पती-पत्नी नाहीत. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने मान्य केले की आयशामुळे धवन ‘मानसिक क्रूरता’ या यातनेतून जात होता. फॅमिली कोर्टाचे न्यायाधीस हरीश कुमार यांनी धवनकडून आयशावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहे. कोर्टाने सांगितले की, आयशाने देखील या आरोपांचा विरोध केला नाही. तसेच बचाव करण्यातही ती अयशस्वी ठरली. 

धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली आयशा किक बॉक्सर आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र 2021 मध्ये आयशा धवनपासून वेगळी झाली. अखेर मार्च महिन्यात मानसिक क्रूरतेच्या अंतर्गत घटस्फोट दाखल केला. धवन आणि आयशा यांच्या घटस्फोटानंतर ‘क्रूरता’ या शब्दाची जोरदार चर्चा झाली. पण क्रूरता म्हणजे काय? यावर कायदा काय सांगतो ते पाहूया. 

काय आहे क्रूरता?

  • – 1955चा हिंदू विवाह कायदा आणि 1954चा विशेष विवाह कायदा या दोन्हींमध्ये ‘क्रूरते’चा उल्लेख आहे. हिंदू विवाह कायदा हिंदू धर्म पाळणाऱ्या लोकांच्या लग्नाला परवानगी देतो आणि घटस्फोट होतो. मात्र स्पेशल मॅरेज कायदा हा दोन वेगवेगळ्या धर्मातील लोकांच्या लग्नाला मान्यता मिळते. 
  • हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ मध्ये घटस्फोटाची तरतूद आहे. यात घटस्फोटाची काही कारणे दिली आहेत. यापैकी एक ‘क्रूरता’ घटस्फोटाचा आधारही मानली जातो. 
  • क्रूरता हे घटस्फोट घेण्याचे अतिशय मजबूत कारण बनू शकते. मात्र कायद्यात याचा उल्लेख नाही  मग क्रूरता कशाला म्हटले आहे? 
हेही वाचा :  चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञाचे 'असे' योगदान

क्रूरता कशी ओळखली जाते? 

  • कायद्यामध्ये याचा उल्लेख नाही पण सामान्यपणे क्रूरता म्हणजे ज्यावेळी जीवन, आरोग्य, शरीर आणि मानसिक या सगळ्या स्तरावर अशांती निर्माण होते. अशावेळी त्याला क्रूरता म्हटलं जातं. 
  • पण कोणत्या प्रकरणात याला क्रूरता समजावे हा निर्णय कोर्टाकडेच असतो. कोर्टाने आपल्या वेगवेगळ्या स्तरावर याला क्रूरता म्हटलं आहे. 
  • पती-पत्नी आपल्यासोबत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला क्रूरता म्हणू शकतात. मात्र हे सिद्ध करणे गरजेचे आहे. 
  • क्रूरतेच्या मुद्द्यावरून घटस्फोट घेताना हे सिद्ध झाले नाही तर घटस्फोट नाकारला जातो. 1998 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाने घटस्फोट यासाठी नाकारला कारण ते आरोप सिद्ध करू शकले नाही. 

घटस्फोट घेण्याची कारणे

  • पती किंवा पत्नी लग्नानंतर स्वतःच्या इच्छेने कोणत्या दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवत असेल 
  • लग्नानंतर जोडीदारासोबत मानसिक किंवा शारीरिक क्रूरता करणे 
  • कोणत्याही कारणाशिवाय दोन किंवा त्याहून अधिक वर्ष लांब राहणे 
  • दोघांपैकी कुणी एकाने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे 
  • दोघांपैकी एक मानसिकरित्या आजारी असेल वैवाहिक जीवनाशी काही संबंध नसेल 
  • दोघांपैकी एक कुष्ठ रोगी असेल तर 
  • दोघांपैकी एकाला यौन संबधित संक्रमणाचा धोका असेल 
  • दोघांपैकी एकाने कुटूंब सोडून सन्यास घेतला तर 
  • पती किंवा पत्नीच्या जिवंत असण्याची कोणतीच माहिती नसणे 
  • लग्नानंतर नवरा बलात्काराचा दोषी असणे 
हेही वाचा :  एक वाघ अन् शेकडो गावकरी; नेमकं नियंत्रित कोणाला करायचं? VIDEO तुफान व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …