Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अखेर दिलासा मिळाला आहे. वसई (Vasai Court) सत्र न्यायालयातून शिझानला जामिन मिळाला आहे. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर.डी. देशपांडे यांच्या समोर 23 फेब्रुवारी 25 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 4 मार्चला सुनावणी झाली होती. शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे 24 डिसेंबरला तुनिषाने वसईच्या कामण येथील सेटवर आत्महत्या केली होती. शिझानने तुनिषाला अत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शिझान न्यायलयीन कोठडीत आहे. 

16 फेब्रुवारी रोजी वालीव पोलिसांनी वसई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. हे आरोपपत्र 500 पानांच होतं. शिझानच्या वकिलांच्या वतीने त्याला जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयातदेखील प्रयत्न सुरु होते. मात्र वालीव पोलिसांनी वसई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने शिझानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायलयात जामीन अर्ज मागे घेतला आणि वसई सत्र न्यायालयात जामिनसाठी अर्ज दाखल केला होता. शिजान आज किंवा उद्या तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय? 

हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं होतं.

हेही वाचा :  Samantha Ruth Prabhu : समंथाची सोशल मीडिया पोस्ट, चाहते म्हणाले.... 

शिझान खान कोण आहे? (Who is Sheezan Khan) 

शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणापासूनच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. ‘जोधा अकबर’ (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याने ‘अलीबाबा : दास्ताने ए कुबुल’ (Ali Baba : Dastaan – E – Kabul) या मालिकेमध्ये देखील काम केलं होतं. या मालिकेत तुनिषाने देखील प्रमुख भूमिका साकारली.

संबंधित बातम्या

तारीख पे तारीख! शिजान खानच्या जामिनावर 2 मार्चला होणार सुनावणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …