Sharad Pawar: अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar On Ajit pawar NCP revolt: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी थेट भाकरी फिरवल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रोहित पवार त्यांच्यासह दिसले. त्यावेळी त्यांनी मोदींना टोला लगावला.

दोन दिवसांपूर्वी मोदींनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होतं. त्यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असल्याचं म्हटलं होतं. मला आनंद आहे की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ दिली त्यामुळे त्यांनी या आरोपातून राष्ट्रवादीला मुक्त केलं. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा :  विशेष अधिवेशनात होणार मराठा आरक्षणाचा कायदा? सगेसोयरे शब्दासह मिळणार मराठा आरक्षण?

अजित पवार यांनी सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असं मी म्हणेल, असंही शरद पवार म्हणाले आहेत. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. सहकाऱ्यांची भूमिका येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

(अपडेट होत आहे…)

अजित पवार काय म्हणाले?

शुक्रवारी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, असा अजित पवार (Ajit pawar) यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबत देखील जाऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

प्रत्येक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. उद्याच्या काळात आम्ही पक्ष म्हणून समोर येणार आहोत. कुठल्याही निवडणुका असोत त्याच पक्षाच्या चिन्ह, नाव यातून निवडणूका लढवणार आहोत, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

आणखी वाचा – Ajit Pawar Oath Ceremony: 2014 पासून तिसऱ्यांदा असं घडलं; विखे पाटलांनंतर अजितदादांनी उठवलं रान!

दरम्यान, इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असतांना छगन भुजबळ हेसुध्दा सोबत काम करत होते. आता ते सोबत आलेले आहेत. काही जण टीका करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा :  Supreme Court ने केंद्र सरकारला फटकारल्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …