Shahrukh Khan : शाहरुखने सौदी अरेबियातील मक्का मशिदीला दिली भेट

Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या चर्चेत आहे. त्याने नुकतीच सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे. मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतो आहे. 

शाहरुख सध्या ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं त्याने आगामी ‘डंकी’ सिनेमाचं शूटिंग सौदीमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. या व्हिडीओवर शाहरुखने उमराह करावा अशा कमेंट्स त्याच्या सौदी अरेबियामधील चाहत्यांनी केल्या होत्या. त्यामुळेच बादशाहने चाहत्यांच्या विनंतीला मान देत उमराह केल्याचं म्हटलं जात आहे. 


News Reels

शाहरुखने सौदी अरेबियामधील मक्का मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. उमराह करताना शाहरुख खूप भावूक झाला, अल्लाह त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं रक्षण करो, मक्का मशिदीला भेट देण्याची शाहरुखची इच्छा अखेर पूर्ण झाली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

‘डंकी’चं शूटिंग पूर्ण

सौदी अरेबियामध्ये शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ सिनेमाचं शूटिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. पण आता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. तसेच त्याने सिनेमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व मंडळींचे आभारदेखील मानले. ‘डंकी’ हा सिनेमा पुढल्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूदेखील झळकणार आहे. राजकुमार हिरानीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

हेही वाचा :  कुणी तरी येणार गं.... सोनम कपूर-आनंद आहुजाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

शाहरुखचे आगामी सिनेमे 

शाहरुख खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या प्रमोशनला किंग खानने आता सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. त्यानंतर शाहरुखचा ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे येत्या वर्षात तीन सिनेमांसह शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

संबंधित बातम्या

Shahrukh khan: ‘जबरा फॅन’; मुलांचं नाव ठेवलं आर्यन, सुहाना आणि अबराम, या जोडप्यानं सांगितले भन्नाट किस्से



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …