‘मटका’ व्यावसायिकाच्या मुलाची नायब तहसिलदार पदी निवड; वडिलांनी दिले उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन!

MPSC Success Story आपल्या परिस्थितीमुळे कोणताही व्यवसाय व नोकरी करावी लागते. तशीच विक्रांत कृष्णा जाधव या युवकाच्या घरची परिस्थिती होती. बारामती शहरातील कृष्णा जाधव हे मटका व्यावसाय चालवत असतं, त्यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला आहे. त्याच जाधव यांच्या घरात जन्मलेल्या विक्रांत यांनी भटक्या विमुक्त जाती मधून घरची परिस्थिती व वातावरण नसताना आकाशाला गवसणी घालणारे यश मिळवले.

विक्रांतचे वडील मटका व्यावसायिक असले तरी त्यांनी मुलाला नेहमीच उच्च शिक्षण,उच्च पदाची स्वप्न दाखविली. मटका व्यवसायाचा घरावर परिणाम न होण्याची दक्षता घेतली. मुलावर योग्य संस्कार होतील याची काळजी घेतली. घरच्या आसपास सगळा गोंधळ, विचित्र लोक असताना वडिलांनी याचा कुटुंबाला कधी त्रास होऊ दिला नाही.विक्रांतचे वडील नेहमी सांगायचे की, मला मटक्याच्या व्यवसायातून मुक्त करयासाठी मी तुला हवी ती मदत करीन .पण चांगला अधिकारी होऊन मला या मटक्याच्या व्यवसायातून मुक्त कर. तू माझे स्वप्न पूर्ण केल्यावर मी समाजात ताठ मानेने फिरु शकतो. आज मुलाने हे स्वप्न पूर्ण केले.

सुरुवातीपासुनच वडिलांनी प्रोत्साहन दिल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. विक्रांतचे म ए सो हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण झाले असून टी.सी कॉलेज मधून कॉमर्स मधून पदवी मिळवली आहे.सुरुवातीला वकिली पेशात प्रवेश करायचे ठरवलेल्या विक्रांत यांनी वडिलांच्या इच्छेसाठी स्पर्धा परीक्षेची बिकट वाट निवडली. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले.२०१७ मध्ये जोमाने ध्येय पूर्ण करण्याच्या उद्देशाने रोज १० -१२ तास अभ्यास सुरू केला .२०१८ साली सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून भटक्या विमुक्त जाती प्रवगार्तून राज्यात पहिला क्रमांकावर निवड झाली. ५ नोव्हेंबर २०१८ साली मटका व्यवसायाच्या वादातून वडिलांचा खून झाला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी १९ मार्च २९१९ ला विक्रांत यांची मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. मुलाला अधिकारी म्हणुन घडविण्याचे स्वप्न पूर्ण झालेले पाहण्यासाठी वडील हयात नव्हते. मात्र,आई आणि लहान भावाने पाठिंबा दिला.त्यामुळे ते दु:ख विसरून चांगला प्रयत्न करत आणखी मोठे पद मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. अखेर, नायब तहसीलदार पदी निवड झाली.

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 17 मार्च 2022 । Chalu Ghadamodi 2022

वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या जिद्दीवर व प्रामाणिक कष्टाच्या जीवावर व आई व लहान भावाच्या पाठिंब्यावर नायब तहसीलदार पदी झेप घेतली आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतमजूराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत एमपीएससीच्या परीक्षेत मारली बाजी

MPSC Success Story : कोणतीही परीक्षा असो की नोकरी याच संयमाची निराळी परीक्षा असते. आपल्याला …

लहानपणी गुरे सांभाळली पण शिक्षणाची कास धरली; वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष यांचा हा प्रवास…

MPSC Success Story : आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचे देखील सोने करणे जमले पाहिजे‌. तेच संतोष …