SBI ची बेस्ट स्कीम : एकदा पैसे जमा करा; दरमहा व्याजासह कमाई, जाणून घ्या कसे?

State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या  ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा सपाटा लावला आहे. आज आम्ही तुम्हाला SBI च्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा कमाई करु शकता. विशेष म्हणजे या सरकारी योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील. यानंतर, तुम्हाला दरमहा व्याजासह हमी उत्पन्न मिळत राहील. 

SBI ची वार्षिकी ठेव योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्या निश्चित उत्पन्नासाठी चांगले पर्याय आहेत. या योजनेत एकरकमी पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर दरमहा व्याजासह कमाईची हमी मिळते. 

लोन की मिलेगी सुविधा

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, या योजनेतील व्याजदर बचत खात्यापेक्षा जास्त आहे. या योजनेत ठेवीवर तेच व्याज मिळते, जे बँकेच्या मुदत ठेवीवर म्हणजेच FD  वर (Fixed Deposit) मिळते. यामध्ये युनिव्हर्सल पासबुकही ग्राहकांना दिले जाते. या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी ठेवी ठेवता येतात. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नाही. त्याचवेळी, मासिक वार्षिकीनुसार किमान ठेव किमान 1000 रुपये करावी लागेल. 

हेही वाचा :  Satyajit Tambe News: सत्यजित तांबे प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उच्च शिक्षण घेतलेल्या डिग्रीवरच प्रश्नचिन्ह

अशी करा गुंतवणूक, मिळवा लाभ

– TDS कापल्यानंतर अ‍ॅन्युइटी पेमेंट लिंक केलेल्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केले जाईल. याशिवाय, तुम्हाला 75 टक्के कर्ज आणि शिल्लक रकमेचा ओव्हरड्राफ्ट देखील मिळू शकतो. तुम्ही हे खाते एकाचे किंवा दोघांचे संयुक्त कोणत्याही प्रकारे उघडू शकता. 

किस तरह से होता है पेमेंट

– या योजनेत, तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला वार्षिक रक्कम भरावी लागेल. तुमची अ‍ॅन्युइटी कोणत्याही महिन्याच्या 29, 30 किंवा 31 तारखेला असेल, तर तुम्हाला पुढील महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे मिळतील. 

कितनी है निवेश की लिमिट?

– या योजनेत तुम्ही 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा करु शकता. सध्या, यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नाही आणि किमान तुम्हाला 1000 रुपये दरमहा गुंतवावे लागतील. 

बचत खाते से भी ज्यादा ब्याज

– स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, या सरकारी योजनेत तुम्हाला बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते. यामध्ये ग्राहकांना एफडी आणि मुदत ठेवीच्या समान व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून अर्ज करु शकता. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …