समुद्रमंथन कथेत उल्लेख असेलला वासुकी नाग खरचं अस्तितत्वात होता; गुजरातमध्ये सापडले अवशेष पाहून वैज्ञानिकही अचंबित

Vasuki Snake : हिंदू धर्मात विष्णु पुराणाला फरा महत्व आहे. विष्णु पुराणात समुद्रमंथनाची कथा सांगण्यात आली आहे. भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं. अमृत मिळवण्यासाठी हे  समुद्रमंथन करण्यात आले. वासुकी नागाचा दोरासारखा वापर करून मंदराचल पर्वताच्या साह्याने समुद्रमंथन करण्यात आलं अशी दंतकथा आहे. समुद्रमंथन कथेत उल्लेख असेलला वासुकी नाग खरचं अस्तितत्वात होता अशी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये वासुकी नागचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष पाहून वैज्ञानिकही अचंबित झाले आहेत. 

समुद्रमंथनावेळी देव आणि दानवांची समेट घडवून आणून अमृतकुंभ मिळवण्यात यश मिळाले. समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले, असं सांगितलं जातं…. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिकमध्ये हे चार थेंब पडले, असं मानलं जातं. म्हणूनच या चार ठिकाणी कुंभमेळा होतो. अशा प्रकारे ही समुद्रमंथनाची अख्यायिका आहे. आता मात्र, आधुनिक संशोधनात समुद्रमंथन कथेत उल्लेख असेलला वासुकी नागाचे अस्तित्व सिद्ध करमारे पुरावे सापडले आहेत. 

वासुकी नागाचा दोरासारखा वापर करून मंदराचल पर्वताच्या साह्याने समुद्रमंथन केले. समुद्रमंथनावेळी अमृत, विष अशा अनेक गोष्टी समुद्रातून बाहेर आल्या. संशोधनादरम्यान वैज्ञानिकांनी वासुकी नागाच्या पाठीच्या हाडांचे 27 भाग आढळून आले आहेत. शास्त्रीय भाषेत याला वासुकी इंडिकस असे म्हणतात. 

हेही वाचा :  Dhule Crime : हात बांधलेले, खिशात STचं तिकीट अन्... प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये वासुकी इंडिकस संदर्भातील अहवाल प्रकाशित झाला आहे. आयआयटी रुरकीचे जीवाश्मशास्त्रज्ञ देबजीत दत्ता यांनी याबाबत माहिती दिली. संशोधनादरम्यान सापडलेल्या या नागाच्या अवशेषांचा आकार हा वासुकी नागासारखा आहे. हा विषारी आणि अत्यंत धोकादायक प्रजातीमधील साप आहे. 

लांबी 36 ते 49 फूट आणि वजन 1000 किलो

या वासुकी नागाची लांबी 36 ते 49 फूट तर याचे वजन तब्बल 1000 किलोच्या आसपास आहे. ॲनाकोंडा आणि अजगर प्रमाणे वासुकी नाग आपल्या भक्ष्याला दाबून मारायचा.  ग्लोबल वार्मिंगचा फटका जीवसृष्टीला बसला आहे. दुर्मिळ प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. तर, अनेक प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वासुकी नागाची प्रजाती देखील अशाच प्रकारे नष्ट झाल्याचा संशोधकांचा दावा आहे. 

वासुकी नाग हा  वासुकी मॅडसोइडे प्रजातीमधील साप होता. हे साप 90 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते. 12 हजार वर्षांपूर्वी  वासुकी नाग नामशेष झाले.  वासुकी नागाची हे भारतातून दक्षिण युरेशिया आणि उत्तर आफ्रिकेत पसरले होते. 50 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा युरेशियाची आशियाशी टक्कर झाली तेव्हा भारताची निर्मिती झाली. संशोधकांना  वासुकी नागाच्या शरीराचे 27 भागांचे अवशेष सापडले असले तरी अद्याप कवटी सापडलेली नाही.  

हेही वाचा :  PAN Card: पॅनकार्डधारकांना मोठा झटका, 31 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, अन्यथा..

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …