समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक

नवी दिल्ली : How to track location : आजकालच्या या डिजीटल युगात आपल्यासाठी इंटरनेट फारच महत्त्वाचं झालं आहे. त्यात गुगल म्हणदे तर अगदी जीवकी प्राण. आपल्या कितीतरी प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आपण गुगलकडूनच घेत असतो. त्यात गुगलचे मॅप्स म्हणजे आपला फुलटाईम वाटाड्याचं झाला आहे. आपल्यापैकी क्वचितच कोणी असेल ज्याला त्याच्या मार्गावर गुगल मॅपने मार्गदर्शन केलं नसेल. पण केवळ रस्ता शोधण्यासाठीच नाही तर गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही कोणालाही न कळवता ट्रॅक देखील करू शकता. अर्थात गुगल मॅपवर एखाद्याला न कळवता त्यांचा मागोवा घेणं हे त्यांच्या गोपनीयतेचा भंग आहे, पण तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे फीचर वापरू शकता. तर नेमकं हे कसं कराल ते जाणून घेऊ…

लाइव्ह लोकेशन शेअरिंग iPhone, iPad आणि Android फोनवर उपलब्ध आहे. लाइव्ह लोकेशन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून शेअर केले जाऊ शकत नाही पण तुम्ही डेस्कटॉपवर इतरांचे शेअर केलेले लोकेशन पाहू शकता. तर आता iPhone, iPad आणि Android वरून Google Maps वर एखाद्याचे लोकेशन कसे ट्रॅक करायचे ते जाणून घेऊ…

कसं कराल ट्रॅकिंग?

  • सर्वात आधी ज्याचं लोकेशन तुम्हाला ट्रॅक करायचं आहे, त्याच्या Android फोन किंवा टॅबमध्ये Google Maps उघडा आणि त्यावरील प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  • त्यानंतर लोकेशन शेअरिंग वर जा आणि तुम्हाला संबधित व्यक्तीचं लोकेशन ट्रॅक करायचं असल्यास त्याची लोकेशन तुमच्या ईमेल आयडीवर शेअर करा…
  • तसंच लोकेशन ही जितक्या वेळासाठी ट्रॅक करायची आहे तो टाईम निवडा.
  • समजा तुम्ही शेअर करत असलेल्या व्यक्तीकडे Google मेल नसेल तर लिंकही शेअर करता येऊ शकते.
  • Apple च्या आयफोन किंवा आयपॅडमध्येही वरील प्रकारेच तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करु शकता. एकदा तुम्ही ही लाईव्ह लोकेशन शेअर करुन घेतली की, तुम्ही संबधित व्यक्ती कधी, कुठे जात आहे, ते पाहू शकता आणि त्याला घरबसल्या ट्रॅक करु शकता.
हेही वाचा :  सावधान..! ही 3 लोकं दुस-याचा पार्टनर हिरावून घेण्यात असतात माहिर, मित्र-मैत्रीण बनून उद्धवस्त करतात सुखी संसार

वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …