सावधान..! ही 3 लोकं दुस-याचा पार्टनर हिरावून घेण्यात असतात माहिर, मित्र-मैत्रीण बनून उद्धवस्त करतात सुखी संसार

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं ही म्हण तुम्ही देखील अनेकदा ऐकली असेल. लोकं या म्हणी मागचा खरा अर्थ समजून न घेता स्वत:च्या सोयीने कुठेही वापरतात हीच काय ती मेख! भले एखाद्याचा पार्टनर हिरावून घेतला तरी मग लोकांना काही वाटत नाही आणि आपण केलेली कृती अयोग्य नाही हे दाखवून देण्यासाठी ही म्हण सहज चिपकवून टाकतात. पण असे म्हटले जाते की जे खरोखर एकमेकांवर प्रेम करतात ते आपल्या नात्यामध्ये तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला येऊ देत नाहीत.

पण फक्त या एका गोष्टीवर अवलंबून राहून तुम्ही तुमच्या जोडीदारावर आंधळा विश्वास टाकू शकत नाहीत. येथे प्रश्न असा आहे की जे लोक इतरांच्या जोडीदारावर नजर ठेवतात अशा लोकांपासून आपल्या जोडीदाराला कसे वाचवायचे? पण यासाठी तुम्हाला अशी लोकं ओळखता सुद्धा आली पाहिजेत आणि ती ओळखायची कशी हेच आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. (फोटो सौजन्य :- iStock)

एका संशोधनातून झाला आहे खुलासा

एका संशोधनातून झाला आहे खुलासा

जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमधील एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जे लोक आधीपासून एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहेत आणि तरी दुसऱ्या कोणाच्या तरी पार्टनर कडे आकर्षित होतात त्यांच्यात मत्सर असतो आणि आत्मविश्वास खूप असतो की मी कोणालाही मिळवू शकतो. बरं आता हा काही उगाच केलेला दावा नाही तर यासाठी संशोधकांनी 187 जोडप्यांवर काम केलं आणि त्यातून हा निष्कर्ष काढला. त्यांच्या निष्कर्षात अशी 2 व्यक्तिमत्त्वे समोर आली आहेत जी दुसऱ्याचा पार्टनर हिरावून घेण्याकडे डोळे लावून बसलेले असतात.

हेही वाचा :  एक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार

(वाचा :- Valentine Day: सदगुरूंनी दिल्या प्रेम-नात्याच्या 5 भन्नाट ट्रिक्स, फॉलो केल्यास तुमच्या प्रेमात आंधळे होईल जग)

असे असतात ते पुरूष

असे असतात ते पुरूष

अभ्यासात असे दिसून आले आहे की जे पुरुष त्यांच्या कामाबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल प्रामाणिक नाहीत आणि ज्यांच्या मध्ये नैतिक मूल्यांचा अभाव आहे आणि फसवणूक करण्याची प्रवृत्ती आहे, ते इतरांचा पार्टनर हिरावून घेताना अजिबात मागे पुढे पाहत नाहीत. ते बिनधास्त त्या पार्टनरवर नजर ठेवतात आणि त्याला हिरावून घेण्यासाठी नानाविध युक्त्या लढवतात. त्यामुळे असे पुरुष जर तुमच्या आसपास असतील तर तुम्ही तुमच्या फिमेल पार्टनरला त्यांच्यापासून दूरच ठेवले पाहिजे.

(वाचा :- आम्ही रोमॅंटिक डेटवर गेलो, रात्रंदिवस चॅटिंग केली, सुखी संसाराची स्वप्न रंगवली अन् एके दिवशी अचानक भयानक..!)

अशा असतात त्या महिला

अशा असतात त्या महिला

ज्या स्त्रिया दुसऱ्याच्या बॉयफ्रेंड किंवा पतीसोबत रिलेशनशिपमध्ये असतात त्या सामान्यतः अत्यंत खुल्या विचारांच्या असतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सायकोपॅथ देखील असू शकतात. संधोधनामधून असे दिसून आले आहे की ज्या स्त्रियांचे त्यांच्या जोडीदाराशी जास्त मतभेद असतात किंवा ज्यांचा जोडीदार जास्त रागीट स्वभावाचा असतो किंवा सतत नैराश्य, चिंता याने त्रस्त असतो, त्यांच्या फिमेल पार्टनर दुसऱ्याच्या मेल पार्टनरकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळे अशा स्त्रिया आसपास असल्यास तुम्ही तुमच्या मेल पार्टनरला त्यांच्यापासून दूरच ठेवणे उत्तम!

हेही वाचा :  अरबाज खानमुळेच 19 वर्षांचा संसार संपवावा लागल्याची मलायका अरोराला खंत, समस्त पुरूष जातीला दिला एक प्रेमळ सल्ला

(वाचा :- मी सप्तपदी चालत होती व बॉयफ्रेंड रडत कोप-यात उभा होता, याच हळव्या झालेल्या मुलाने पुढे जे केलं ते ऐकून हादराल)

अशा प्रकारच्या लोकांपासून सुद्धा राहा दूर

अशा प्रकारच्या लोकांपासून सुद्धा राहा दूर

तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते किंवा जे लोक स्वत:ला कमी लेखतात, ते इतरांच्या पार्टनरवर डोळा ठेवतात. म्हणजे सामान्यत: अशा लोकांमध्ये ती भावना अचानक जागृत होते व त्यांना सतत वाटते की दुसऱ्याचा पार्टनर मला मिळावा. असे लोक आधी मैत्री करतात आणि संधीचा फायदा घेत नात्यात दुरावा निर्माण करतात. कारण त्यांना स्वतःसाठी योग्य जोडीदार शोधण्यापेक्षा हे काम सोपे वाटते.

(वाचा :- मलायका अरोराचा समस्त पुरूष जातीला प्रेमळ सल्ला, अरबाजसोबत 19 वर्षांचा संसार तोडल्यानंतर हळवी होत म्हणाली की..!)

प्रेमात गाफील राहू नका

प्रेमात गाफील राहू नका

अनेकदा आपल्याला वाटते की आपले आपल्या जोडीदारावर खूप प्रेम आहे म्हणजे आपल्या नात्यात कधीच कोणी तिसरा व्यक्ती येऊ शकत नाही. तर मंडळी हे प्रत्येक नात्याला लागू होईलच असे नाही. मानवी स्वभाव हा खूप चंचल असतो. तुम्ही तुमच्या जोडीदारावर कितीही नितांत प्रेम करा, पण तिसरा व्यक्ती येऊन त्याला तुमच्या असून हिरावू शकणार नाही याची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही सावध राहिले पाहिजे आणि आपल्या जोडीदारच्या बदलत्या वागणुकीचा आढावा घेऊन आपले रिलेशनशिप वाचवले पाहिजे.

हेही वाचा :  'सन्माननीय सदस्य न्याय मिळाला पाहिजे चौकशी करू, समिती नेमू...' सदाभाऊंनी सांगितला नाथाभाऊंचा कानमंत्र

(वाचा :- Sleep Divorce: घटस्फोट घेण्याचा काळ गेला आताचे कपल्स घेतात थेट स्लीप डिवोर्स, संकल्पना ऐकून हलेल डोक्याची नस.!)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …