Rishabh Pant : अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला पंत? ऋषभने सांगितलं…

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतचा (Rishabh Pant) शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे. पंतच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, आता अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना उत्तराखंडमध्ये हम्मदपूरजवळ पंतचा अपघात झाला.

अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला ऋषभ?

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्याला घटनास्थळावरून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ऋषभने एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की, तो गाडीतून कसा बाहेर पडला हे काहीही त्याला आठवत नाही. मीडिया रिपोर्टनुसरा सहायक पोलीस आयुक्त देहात स्वप्ना किशोर सिंह यांनी माहिती दिली. ऋषभने पोलिसांना सांगितलं की, ऋषभ गाडीतून कसा उतरला? याबाबत त्याला काहीही आठवत नाही. ऋषभ इतका ट्रॉमामध्ये होता की त्याला काहीच आठवत नव्हते.

हेही वाचा :  अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral

अपघातानंतर ऋषभ ट्रॉमामध्ये होता

मिळालेल्या माहितीनुसार, अशा गाडीमध्ये अपघातानंतर सहसा काही सेकंदात आग लागते. गाडीला आग लागण्यापूर्वी ऋषभ स्वतः दरवाजा उघडून बाहेर आला असेल का? यावर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने कारला आग लागली. तेवढ्या वेळेत एतक कुणीही गाडीजवळ जाऊन ऋषभला बाहेर काढण्याची शक्यता फार कमी आहे. ऋषभचा अपघात किती भीषण होता हे, गाडीची अवस्था आणि व्हायरल फोटोमधून (येथे पाहा) तुम्हाला कळेल. त्यामुळे अपघातानंतर ऋषभ शॉकमध्ये होता आणि त्याला त्यावेळी नेमकं काय घडले हे आठवत नाहीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ऋषभ स्वत: गाडीतून बाहेर पडला असावा किंवा अपघातानंतर आग लागण्यापूर्वी कुणीतरी लगेचच गाडीपर्यंत पोहोचला असावा आणि त्याने गाडीतून बाहेर काढले असेल. अपघातानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये गाडीने पेट घेतला आणि आगीत कार जळून खाक झाली.

live reels News Reels

मीडिया रिपोर्टनुसार, अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. पण त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …