कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; ‘असा’ करा अर्ज

Konkan Railway Bharti: चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येतील.  यामध्ये सिनिअर टेक्निकल असिस्टंटची 1 जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर (टेंडर आणि प्रपोझल) च्या 8 जागा, कॅड/ड्राफ्टमनची 1 जागा, असिस्टंट इंजिनीअर/ कॉन्ट्रॅक्टची 1 जागेचा समावेश आहे. 

सिनीअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी आणि प्रोजेक्ट इंजिनीअर (टेंडर आणि प्रपोजल) पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 10 लाख इतका पगार असेल. कॅड/ ड्राफ्टमन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7 ते 8 लाख रुपये पगार दिला जाईल. तर असिस्टंट इंजिनीअर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 11 ते 13 लाख रुपये इतका पगार दिला जाईल, याची नोंद घ्या. एवढेच नव्हे तर मोबाईल फोन भत्ता, मेडिकल भत्ता, ट्रॅव्हल फॅसिलिटी, रेस्ट हाऊस, मॅटरनिटी अशा सुविधा देखील दिल्या जातील. 

थेट मुलाखतीतून होणार निवड 

सिनीअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांची मुलाखत 25 जून रोजी, प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी 27 जून रोजी, प्रोजेक्ट इंजिनीअर (टेंडर्स अॅण्ड प्रपोजल) साठी 20 जून रोजी, कॅड/ ड्राफ्ट्समनसाठी 15 जून आणि असिस्टंट इंजिनीअरसाठी 24 जून रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. 

हेही वाचा :  SBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBIकडून नवा आदेश जारी

यासाठी उमेदवारांना एक्झिक्युटीव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड. सिवूड रेल्वे स्टेशनजवळ. सेक्टर-40. सिवूड (पश्चिम) नवी मुंबई येथे उपस्थित राहावे लागणार आहे. 

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. मुवाखतीवेळी लागणारी कागदपत्रे सोबत आणायला विसरु नका.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Tinder गर्ल गोडीगुलाबीने कॅफेत बोलावायची, नंतर यायचा मॅनेजर; डेटींग अ‍ॅपवरुन ‘अशी’ चालायची फसवणूक

Delhi Tinder Date Fraud: सध्याच्या जगात तरुण-तरुणी एकमेकांना भेटण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अॅपचा वापर करतात. पण …

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …