रजनीकांत-हेमा मालिनी यांचा ‘अंधा कानून’ ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार

Rajinikanth -Hema Malini : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत  (Rajinikanth) आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांची एकत्रित भूमिका असलेला ‘अंधा कानून’  (Andhaa Kaanoon)  चित्रपट आता ओटीटीवर (OTT) आलाय. ओटीटीवर आल्यामुळे 1983 ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेषकांना आता पुन्हा पाहता येणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी हेमा मालिनी यांच्या भावाची भूमिका साकारली होती आणि त्यांना खूप त्रास दिला होता. लाखो चाहते असलेल्या या दोघांचा चित्रपटाने त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये जोरदार धडाका लावला होता.  

1983 ला आलेल्या ‘अंधा कानून’ या चित्रपटात रजनीकांत आणि हेमा मालिनी यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात रजनीकांत यांनी हेमा मालिनी यांच्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांना रजनीकांत यांनी खूप त्रास दिला होता. दोघांचाही भारतासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट ओटीटीवर देखील चालणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चीत्रपट ओटीटीवर येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी उत्साही होते.  
 
‘अंधा कानून’ हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. या चित्रपटात विलनची संख्या जास्त आहे. रजनीकांत हे बदल्याच्या भावने विलनच्या मागावर जातात आणि विलनचा खात्मा करतात. तर हेमा मालिनी या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. हेमा मालिनी या रजनीकांत यांच्या मागावर आहेत. पण हेमा मालिनी कधीच रजनीकांत यांना पकडू शकत नाहीत, अशी  ‘अंधा कानून’ या चित्रपटाची कथा आहे. हा  चित्रपटाने 1983 चा सुपरहीट चित्रपट ठरला होता. ओटीटीवर आल्यामुळे आता चाहत्यांना दुसऱ्यांदा हा चित्रपट पाहात येणार आहे. शिवाय त्यावेळी ज्यांनी हा चित्रपट पाहिला नव्हता त्यांना देखील आता हा चित्रपट पाहात येणार आहे.   

हेही वाचा :  किच्चा सुदीपच्या 'Kabzaa'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

अमिताभ बच्चन गेस्टच्या भूमिकेत 

अंधा कानून चित्रपटाचे टाइटल गाणं अमिताभ बच्चन (Rajinikanth) यांच्या गेस्ट एन्ट्रीवर बनवले होते. ‘अंधा कानून’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची खूप महत्वाची भूमीका  होती. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन  यांच्या जोडीचे प्रेषकांनी खूप कौतुक केले होते. 

महत्वाच्या बातम्या

Gautami Patil : गौतमी म्हणतेय ‘रात्रभर जागली विचारात तुमच्या’; गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील ‘मी करते तुम्हाला मुजरा’ लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …