Pariksha Pe Charcha 2022: परीक्षेला उत्सवी वातावरणात सामोरे जा – पंतप्रधान

Pariksha Pe Charcha: ‘एका मोठ्या खंडानंतर मला आज विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे. परीक्षेचे तुम्हाला काही टेन्शन असेल असे मला वाटत नाही. टेन्शन असेलच तर ते तुमच्या पालकांना असेल. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण एका उत्सवी वातावरणात परीक्षा द्यायला हवी. एप्रिल महिना हा परीक्षांचा असतो आणि याच काळात खूप सण-उत्सवही साजरे होतात. परीक्षेतही एखाद्या सणासारखे रंग भरायला हवेत. परीक्षेला घाबरण्याची अजिबात गरज नाही,’ असे आवाहन परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.

विद्यार्थ्यांचा मनातील परीक्षेची भिती, परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनालाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली. सुमारे १५ लाख विद्यार्थी आणि अडीच लाख शिक्षकांनी देशभरातून या कार्यक्रमाला हजेरी लावली.

करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून याचे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जात होते. यावेळेस परीक्षा पे चर्चा नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये करोना काळानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिले हे सल्ले –

हेही वाचा :  गणेश चतुर्थीलाच नवीन संसदेचा श्री गणेशा! PM मोदी म्हणाले, 'जुन्या संसदेला 'जुनी संसद' असं न म्हणता...'

परीक्षेला सामोरे जाताना घाबरू नका. स्वत:वर विश्वास ठेवा.
– परीक्षेचे माध्यम कोणते हे महत्वाचे नाही, तुमचे लक्ष किती हे महत्त्वाचे आहे.
– एकाग्र मनाने अभ्यास कराल तर यश तुमचेच आहे.
– परीक्षा काळात वातावरणात, सवयींमध्ये मोठा बदल करू नका.
– तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा
– नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून खेळांचाही शालेय जीवनात मोठा सहभाग
– नव्या शैक्षणिक धोरणात सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे
– २१ व्या शतकासाठी नव्या धोरणांची गरज

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले, ‘करोनाच्या खडतर काळानंतर आता शाळा सुरू झाल्या आहेत. देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आज ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर आपण हा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम करतो आहोत, याचा आनंद आहे. मुलांची ही भावी पिढी तयार करण्यासाठी घरातल्या कुटुंबप्रमुखांच्या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.’

यंदा १२ लाखांहून अधिक विद्यार्थी २.७ लाखांहून अधिक शिक्षक आणि ९० हजारांहून अधिक पालकांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२२’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली होती. ‘परीक्षा पे चर्चा २०२२’ साठी नोंदणी २८ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली. २० जानेवारी २०२२ ही नोंदणीची अंतिम तारीख होती. या नोंदणी प्रक्रियेस २७ जानेवारी आणि नंतर ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

‘सीबीएसई’ बोर्डाच्याच विद्यार्थ्यांना चर्चेचा लाभ

हेही वाचा :  'भारतरत्न' जाहीर झाल्यानंतर अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, मानले 'या' दोन नेत्यांचे आभार; '14 वर्षांचा असताना RSS मध्ये...'

आज, शुक्रवारी (दि. १) होणाऱ्या कार्यक्रमाच्या दिवशी दहावीचा शेवटचा पेपर आहे, तर १२वीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे एसएससी व एचएससीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा फायदा होणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. फक्त केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळेतील विद्यार्थ्यांना या चर्चेचा फायदा होणार आहे.
Pariksha Pe Charcha: ‘परीक्षा पे चर्चा’साठी शाळांमध्ये व्यवस्था करा; शिक्षण विभागाच्या सूचना

Pariksha Pe Charcha 2022: पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेच्या टिप्स
MHT CET 2022: कोणत्या अभ्यासक्रमाची सीईटी कधी? जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …