या डाळीने बनवलेला इडली व डोसा खाणा-यांनो सावधान, फुफ्फुसापर्यंत पसरतं ‘विष’

डोसा व इडली हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे, जे संपूर्ण देशभरात आवडीने खाल्ले जातात. पण काही लोकांनी ते खाणे कटाक्षाने टाळावे. कारण काही लोकांना यामुळे पोट आणि पचनाच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आयुर्वेदातील डॉक्टर वरालक्ष्मी यांनी या समस्येवर उपाय सांगितला आहे.

डोसा आणि इडली बनवण्यासाठी साधारणपणे उडीद डाळीचा वापर केला जातो. आयुर्वेदात उडदाची डाळ अ‍ॅसिडिटी वाढवते असे सांगितले आहे. या समस्येला बोलीभाषेत गॅस, अ‍ॅसिडीटी किंवा पोटात विष होणं असं म्हणतात.

आयुर्वेदात उडीद डाळ खाण्याचे दुष्परिणाम

डॉक्टर वरालक्ष्मी यांच्या मते, उडीद डाळ कफ आणि पित्त दोष वाढवते. याशिवाय, ती ‘अभिष्यंदी’ आहे, ज्यामुळे ती शरीरातील रक्तवाहिन्यांना ब्लॉक करण्याचे काम करते आणि शरीरातील अमा अर्थात विषारी घटक वाढवते. या डाळीच्या सेवनाने शरीरातील सूज देखील वाढते.

(वाचा :- रात्री लागत नाही सुखाची झोप? मग डॉक्टरकडे जाण्याआधी सुधारा या 5 सवयी, वाचेल हजारो रूपये फी व येईल गाढ शांत झोप)

हेही वाचा :  Crorepati: आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

या लोकांनी खाऊ नये उडीद डाळ

आयुर्वेद डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना खालील समस्या आहेत त्यांनी उडीद डाळ किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये.

  1. अ‍ॅसिडीटी
  2. अ‍ॅसिड रिफ्लक्स
  3. हार्ट बर्न

(वाचा :- Mental Health Tips : मेंटल हेल्थ खराब करतात या गोष्टी, झोप आणि शांती घेतात कायमची हिरावून, व्हा सावध)

कोणत्या गोष्टींपासून बनवावी डोसा व इडली

आयुर्वेदिक डॉक्टर वरालक्ष्मी यांच्या मते, जर तुम्हाला छातीत जळजळ किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या असेल तर घरगुती डोसा आणि इडलीचे सेवन करावे. ते बनवण्यासाठी तांदूळ आणि मेथी दाण्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

(वाचा :- Uric Acid : गुडघ्यासोबत सांधेही होतील लाकडासारखे खिळखिळे, हे पदार्थ हाडांत भरतात युरिक अ‍ॅसिड, चुकूनही खाऊ नका)

वाढवते रक्तातील युरिक अ‍ॅसिड

एका रिसर्चनुसार, उडीद डाळ खाल्ल्याने रक्तातील यूरिक अ‍ॅसिड वाढू शकते. ज्यामुळे किडनी स्टोन अर्थात मुतखडा देखील होऊ शकतो. म्हणूनच ही डाळ मर्यादित प्रमाणातच खावी.

(वाचा :- Walking for Heart : रोज न चुकता इतकी पावलं चाला, हृदय होईल ‘Bulletproof’, पण सोबत ठेवावी लागेल ‘ही’ 1 वस्तू..!)

हेही वाचा :  चिमूटभर हळदीने गायब होतील चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स, वापरा सोपी पद्धत

FAQ : प्रश्नोत्तर

faq-
  • उडदाची डाळ कधी खावी?

काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, उडदाची डाळ खाण्याची सर्वोत्तम वेळ दुपारची असते. कारण, यामुळे रात्री अपचन, गॅस आणि अ‍ॅसिडीटीची समस्या होऊ शकते.

  • उडदाच्या डाळीचे काय फायदे आहेत?

उडीद डाळ खाल्ल्याने आयर्न आणि प्रोटीन मिळते. हे हृदय, पोट आणि रक्तातील साखरेसाठी चांगले मानले जाते.

(वाचा :- Joint Pain: पुरूषहो, सर्व समस्या व गुडघेदुखीतून मिळेल 100 टक्के कायमची मुक्ती, फक्त भाजून खा या भाजीच्या बिया)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उडीद डाळ खाण्याचे साईड इफेक्ट्स..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करताय का? तुम्हीच नाही तर प्रत्येक दुसरा भारतीय नव्या नोकरीच्या शोधात, पण कारण काय?

Job News : शिक्षणाची पायरी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण मनाजोग्या नोकरीच्या शोधात असतो. सरकारी असो वा खासगी, …

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics :  महायुतीत प्रचंड तणाव असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अजित पवारांना महायुतीतून …