इअरफोनचा वापर देतोय बहिरेपणाला आमंत्रण

अलीकडेच कानांचे विकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात होत असलेला इअरफोनचा वापर कारणीभूत ठरतानाही दिसून येत आहे. या वर्ल्ड हेअरिंग डे निमित्त जाणून घेऊयात कशाप्रकारे ही समस्या बहिरेपणाला आमंत्रण देत आहे. यासाठी आम्ही डॉ. मनोज बाऊस्कर, कान, नाक घसा विकार तज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांच्याशी बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इअरफोन जास्त वापरण्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. (फोटो सौजन्य – iStock)

​इअरफोनमुळे ऐकण्याची क्षमता होते कमी​

​इअरफोनमुळे ऐकण्याची क्षमता होते कमी​

सध्या वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा, घर बसल्या वेब सिरीज पाहणे, सतत फोन सुरु असणे आणि त्याकरिता तासनतास इअरफोन्सचा वापर करण्याचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. यामुळे डोके दुखी, कान दुखणे अशा समस्या पहायला मिळतात. यासाठी तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असून इअरफोनचा वापर कमी करणं गरजेचं आहे.

इअरफोनच्या नियमित वापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. कानाचा पडदा वायब्रेट व्हायला लागतो. दूरचा आवाज ऐकण्यात त्रास होतो. यामुळे तुम्हाला बहिरेपणा देखील येऊ शकतो. तसेच कान दुखणे, डोकेदुखी, झोप न येणे अशा समस्या उद्भवतात.

हेही वाचा :  4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत

​मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने त्रास​

​मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने त्रास​

इअरफोन कानात घालून मोठ्या आवजात गाणी एकल्याने मानसिक ताण वाढू शकतो. इअरफोनच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचते. अधिक वेळ इअरफोनच्या वापराने कानातील पेशी मृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना इअरफोन वापरापासून परावृत्त करणं गरजेचं आहे.

(वाचा – Eye Care: कॉन्टॅक्ट लेन्सेसची चांगली स्वच्छता ठेवण्यासाठी टिप्स)

​कानाच्या विकाराचा धोका​

​कानाच्या विकाराचा धोका​

मोठ्यांनीही कानाच्या विकाराचा धोका समजून घेत इअरफोनचा वापर करणे आवश्यक आहे. जास्त वेळ इअरफोनचा वापर केल्यास कानात हवा जाण्याच मार्ग राहत नाही आणि त्यामुळे कानात संसर्ग होऊन त्याचा परिणाम श्रवणशक्तीवर होऊ शकतो.

(वाचा – Holi 2023: होळी खेळताना रंग डोळ्यात जाण्याची आहे का भीती? अशा पद्धतीने काळजी, सोप्या टिप्स)

​कानात जीवाणूंची वाढ​

​कानात जीवाणूंची वाढ​

सततच्या वापराने जीवाणूंची वाढ होऊन कानात मळ साठू शकतो. इअरफोनमधून निघणारे चुंबकीय तरंग मेंदूला नुकसान पोहोचवून त्यावर वाईट परिणाम करू शकतात. हेडफोन वापरण्याने कानाच्या बाहेरील भागात त्वचेचा संसर्ग होतो. कानाच्या त्वचेला रॅश येणे, त्वचेला फोड येणे, कानात बुरशी होणे, तयार झालेला मळ बाहेर न पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. कानाच्या आतील भागात आवाज प्रदूषणामुळे बहिरेपणा वाढण्याचा धोका आहे.

हेही वाचा :  टोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले "हे बोलण्यापेक्षा..."

(वाचा – हे नैसर्गिक उपाय करतील घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्याचे काम, तज्ज्ञांचा सल्ला)

​दुसऱ्याचे हेडफोन्स अजिबात वापरू नका​

​दुसऱ्याचे हेडफोन्स अजिबात वापरू नका​

दुस-या व्यक्तीने वापरलेले हेडफोन्स स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा. जेणेकरून कानाचा संसर्ग पसरणार नाही. इअरफोन्सचा वापर कानांसोबत हृदयालाही नुकसानदायी होऊ शकते. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढू शकते. यावर एकमेव उपाय म्हणजे इअरफोनचा वापर कामाशिवाय करणे टाळणे किंवा कमी करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …