Note Exchange: २ हजारच्या नोटेसाठी बॅंकेत रांग लावण्याची गरज नाही, घरबसल्या ‘अशी’ मिळवा सुविधा

Rs 2000 Note Exchange: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करुन २ हजारांच्या नोटा सुरु करण्यात आल्या होत्या. आता २ हजार रुपयांच्या नोटा देखील बंद करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच बँकांना 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचे आदेश दिले आहेत. 

आरबीआयने लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या सर्व नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे आवाहन केले आहे. 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर तात्काळ या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. दरम्यान २ हजारच्या नोट बंद करताना सरकारने सावधता बाळगली आहे. त्यामुळे या नोटा ताबडतोब चलनातून बाद होणार नसल्या तरी, नोटा बदलण्यासाठी बँकेत जाणे हे एक त्रासदायक काम आहे. 

नोटा बदलण्यासाठी बॅंकेत जाण्याचा कंटाळा आला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. अॅमेझॉनने यावर उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार अमेझॉन पेच्या मदतीने तुम्ही या नोटा घरबसल्या बदलू शकणार आहात.  ‘अमेझॉन पे’कडून तुमच्या दारात आलेली व्यक्ती २ हजारच्या नोटेच्या बदल्यात अमेझॉन पेमध्ये ही रक्कम जमा करुन देणार आहे.

अमेझॉनने अमेझॉन पे कॅश लोड सिस्टीम आणली आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या दारात येऊन २००० रुपये बदली करण्याची सुविधा दिली जाईल. या यंत्रणेच्या मदतीने तुम्ही अॅमेझॉन पे बॅलन्समध्ये दरमहा 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरु शकता.

हेही वाचा :  भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली

यातून तुम्हाला अमेझॉनवर ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. एवढंच नव्हे तर अमेझॉन पे यूजर्सना त्यांचे पैसे बॅंक खात्यात हस्तांतरित करता येतील. यासोबतच्या मित्र आणि कुटुंबीयांना पाठविता येणार आहेत. ही सुविधा केवायसी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

तुमच्या दारात आलेल्या डिलिव्हरी एजंट्सना रोख डिलिव्हरी करून तुमची अमेझॉन पेचा बॅलेन्स टॉप अप करण्याची सुविधा ही भारतातील आमच्या अनोख्या सेवांपैकी एक असल्याचे ‘अॅमेझॉन पे इंडिया’चे पूर्णवेळ संचालक विकास बन्सल म्हणाले. ग्राहकांना अशा सुविधा पुरवून आम्ही भारतातील डिजिटल पेमेंट क्रांतीला आणखी चालना देऊ, असेही ते म्हणाले.

पुढील स्टेप्स करा फॉलो

तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या कोणत्याही उत्पादनासाठी, प्रथम अमेझॉनवर ऑर्डर द्या. अमेझॉन पे बॅलन्समध्ये डिलिव्हरी झाल्यावर कॅश जमा करण्याची परवानगी दिली जाईल. 

चेकआउट प्रक्रियेदरम्यान, “कॅश ऑन डिलिव्हरी” पर्याय निवडा. या पर्यायामुळे तुमच्या ऑर्डरसाठी कॅश ऑन डिलिव्हरीने पैसे देण्याची परवानगी मिळते.

घरी आलेल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याला ‘अमेझॉन पे बॅलेन्स’मध्ये रोख जमा करायची असल्याचे सांगा. आता 2000 रुपयांच्या नोटेसह रोख रक्कम संबंधित सहकाऱ्याला द्या. ते रकमेची पडताळणी करतील आणि ठेव प्रक्रिया सुरू करतील.

हेही वाचा :  INDIA की BHARAT ? संविधानात नेमकं काय लिहिलंय?

डिलिव्हरी सहयोगी तुमच्या Amazon Pay बॅलन्स खात्यात तुमच्याद्वारे दिलेली रोख रक्कम त्वरित जमा करेल.
व्यवहार पूर्ण झाल्यावर, रोख ठेव तुमच्या खात्यात यशस्वीरित्या जमा होईल. तुमच्या ‘अमेझॉन पे’चा बॅलेन्स तपासून तुम्ही याची खात्री करु शकता. यासोबतच तुम्ही अॅमेझॉनच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर तुमची शिल्लक तपासू शकता.

दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. ज्या व्यक्तींकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 23 मे 2023 पासून त्या बदलू शकतात किंवा कोणत्याही बँकेत जमा करू शकतात, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केली आहे.

ही सुविधा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहील. असे असले तरीही त्यानंतरही 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून त्यांचा दर्जा कायम ठेवतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …