महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत नागपूर मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Pench Tiger Reserve Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागामार्फत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे विविध पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 05 ऑगस्ट 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 16

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जीवशास्त्रज्ञ- 01
शैक्षणिक पात्रता :
वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी.

2) पशुवैद्यकीय अधिकारी- 01
शैक्षणिक पात्रता :
स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.

3) निसर्ग पर्यटन व्यवस्थापक – 02
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका

4) सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक – 02
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका

5) उपजीविका तज्ञ – 02
शैक्षणिक पात्रता
: सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान 02 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी 05 वर्षाचा अनुभव.

हेही वाचा :  KAPL Recruitment 2023 – Opening for Various Representative Posts | Apply Offline

6) सर्वेक्षण सहाय्यक- 01
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी 40 शप्रमी, मराठी 30 शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव.

7) GIS तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी 03 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.

8) ग्राफिक डिझायनर – 01
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका.

9) सिव्हिल इंजिनियर- 01
शैक्षणिक पात्रता :
Civil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 03 वर्षाचा अनुभव

10) बचाव मदत टीम – 04
शैक्षणिक पात्रता :
किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव प्रमाणपत्र

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
जीवशास्त्रज्ञ रु. 30,000/-
पशुवैद्यकीय अधिकारी रु. 50,000/-
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 25,000/-
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 15,000/-
उपजीविका तज्ञ रु. 30,000/-
सर्वेक्षण सहाय्यक रु. 15,000/-
GIS तज्ञ रु. 30,000/-
ग्राफिक डिझायनर रु. 20,000/-
सिव्हिल इंजिनियर रु. 30,000/-
बचाव मदत टीम रु. 10,000/-

हेही वाचा :  झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेशची पोलिस उपनिरीक्षक पदी गवसणी; वाचा त्याच्या यशाची कहाणी

उमेदवारांसाठी महत्वाचे :
सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
वरील तक्त्यातील दर्शविलेल्या मुख्यालया व्यतीरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रा मधील ईतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरिता बायोडाटा (Resume ) व अर्ज तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
उमेदवार हा कोणत्याही इतर शासकिय, निमशासकिय अशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकरी असता कामा नये.
सदर पदे ही पूर्णवेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.
नियुक्ती झालेल्या जलद बचाव गट सदस्यास २४ तास सेवे करीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रा बाहेर व कोणत्याही ठिकाणी जलद बचाव गटाचे कार्य करावे लागेल.
वरिल सर्व पदाबाबत संगणकाचे पुरेसे ज्ञान अत्यावश्यक / आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 05 ऑगस्ट 2023

हेही वाचा :  सायकलपटू प्रियंकाचे वर्दी मिळवायचे स्वप्न झाले साकार! वाचा तिच्या यशाची कहाणी..

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahaforest.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …