NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग म्हणजेच एनसीईआरटीमध्ये विविध पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणती लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तर थेट मुलाखतीत तुम्ही जे कौशल्य दाखवाल त्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे. 

एनसीईआरटी अंतर्गत 30 पदे भरली जातील. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शैक्षणिक सल्लागारच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थएतून पोस्ट ग्रुज्युएशन केलेले असावे.

द्विभाषिक अनुवादकची एकूण 23 पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मास्टर डिग्री असावी. ज्युनिअर प्रोजेक्ट फेलोची 4 पदे भरली जातील. यासाठी मास्टर डिग्रीच्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल. 

हेही वाचा :  Sharad Pawar: अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शैक्षणिक सल्लागार, द्विभाषिक अनुवादक,ज्युनिअर प्रोजेक्ट फेलो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यासाठी  वयवर्षे 40 ते 45 दरम्यान असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही याची नोंद घ्या. 

या विविध पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 29 हजार ते 60 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. 10, 11 आणि 13 मे 2024  रोजी यासाठी थेट मुलाखत होणार आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रुम नंबर 242, सीआईटी, दुसरा मजला, सेक्शन ऑफिसर (एसओ), प्लानिंग अॅण्ड रिसर्च डिव्हीजन, चाचा नेहरु भवन, सीआयईटी, एनसीईआरटी, नवी दिल्ली-110 016 येथे उपस्थित राहायचे आहे. या दिवसानंतर पुन्हा मुलाखतीची संधी दिली जाणार नाही, हे उमेदवारांनी लक्षात ठेवा. तसेच नोकरी देण्याच्या बहाण्याने कोणी पैसै मागत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. नोकरी प्रक्रियेतील प्रत्येक अपडेट तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्…

Ulhasnagar Crime News: देशात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे चित्र आहे. क्षुल्लक कारणावरुन जवळच्याच लोकांकडून दिवसाढवळ्या हत्या …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना

Shivsena Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत.  विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी …