Viral News : जगात ‘या’ दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Viral News : मृत्यू हा शब्दच आपल्याला हादरवून सोडतो. त्यात जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर आपण निशब्द होतो. जीवन हे अनिश्चित आहे पण मृत्यू हा अटळ आहे. जेव्हा काही देशात सूर्य उगवतो त्याच वेळेला दुसऱ्या देशात सूर्य मावळत असतो. अगदी असतं जीवन आणि मृत्यूचं आंतरिक नातं आहे. तरीदेखील जीवनापेक्षा मृत्यूचेच भय या जगात अधिक आहे. 

हे जग वेगवेगळ्या रहस्यांननी भरलेलंय. त्यातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे मृत्यू…ज्याबद्दल कोणीही काही सांगू शकतं नाही. पण आजही या मृत्यूशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. तुम्हाला माहिती आहे का या जगात कुठला असा दिवस आहे ज्या दिवशी यमराज पृथ्वीवर येतो आणि असंख्य लोकांना आपल्यासोबत घेऊन जातो? महिन्यातील कुठला तो दिवस आहे याबद्दल एका अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 

ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून हे समोर आलं आहे. या अभ्यासातून सर्वाधिक मृत्यू कोणत्या दिवशी होतात याचं गुपित उघड करण्यात आला आहे. आफ्टर लाइफ सर्व्हिसेस साइट ‘बियॉन्ड’च्या अभ्यासानुसार ब्रिटनमध्ये मृत्यूचा सर्वात सामान्य दिवस 6 जानेवारी आहे, असं समोर आलं आहे. या अभ्यासानुसार, ख्रिसमस नंतरचा काळ मृत्यूच्या दृष्टीने सर्वात धोकादायक आहे हे सर्वात मोठे रहस्य उघड झालं आहे. 

हेही वाचा :  सर्वात लांब बोगदा! पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाला हिरवा कंदिल; लोकलची गर्दी कमी होणार

अभ्यास या गोष्टी आल्या समोर !

अभ्यासानुसार, 2005 पासून ब्रिटनमध्ये दररोज 1387 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण या आश्चर्यकारक म्हणजे 6 जानेवारीला मृतांची संख्या 1732 वर गेल्याच समोर आलं आहे. 30 डिसेंबर ते 9 जानेवारी दरम्यान ब्रिटनमधील सर्वात धोकादायक दिवस असल्याच या अभ्यासातून समोर आलं आहे. 11 दिवसांचा हा मध्यांतर मृत्यूच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. नवीन वर्षाचा दिवस हा तिसरा सर्वात धोकादायक दिवस असल्याचेही या अभ्यासात समोर आलं आहे. तर नववर्षाची संध्या या बाबतीत पाचव्या क्रमांकावर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या काळात होणाऱ्या मृत्यूला कडाक्याची थंडी कारणीभूत असल्याचं बोलं जातं आहे. कारण या काळात लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे लोक सहजपणे आजारांच्या संपर्कात येतात आणि त्यातून त्यांना मृत्यू गाठतो. 

उन्हाळ्यात जास्त मृत्यू होतात का?

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये उत्तर गोलार्धात इन्फ्लूएन्झा रोगामुळे असंख्य लोकांचा मृत्यू होतो. तर ब्रिटनमध्ये सर्वात कमी मृत्यू 30 जुलैला होतात. कारण नंतर हवामान गरम होतं, असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की उन्हाळ्यात मृत्यूचं प्रमाण हिवाळ्याच्या तुलनेत जास्त असतं. म्हणजे हिवाळ्यापेक्षा उन्हाळा जास्त धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. 

हेही वाचा :  Viral News : बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करण्यासाठी वेळ नाही म्हणून गर्लफ्रेंडने लढवली अनोखी शक्कल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …