शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Agniveer Akshay Gawate: मागील वर्षी लागू केलेल्या अग्नीविर योजनेत भारतीय सैन्यात भरती झालेल्या वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. अक्षय गवते हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे रहिवासी होते. २० ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय गवते यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. शहीद जवान अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना किती नुकसानभरपाई मिळणार याबाबत चर्चा होत असता आता भारतीय लष्कराने एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. गवते यांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती आकडेवारीसह एक्सवर पोस्ट केली. 

‘अग्नवीर (ऑपरेटर) गवते अक्षय लक्ष्मण यांनी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली. या दु:खद प्रसंगात भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अक्षय गवते यांच्या निकटवर्तीयांना आर्थिक मदत करण्याबाबत सोशल मीडियावरील परस्परविरोधी संदेश पाहता, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की नातेवाईकांना मिळणारे मानधन सैनिकाच्या संबंधित अटी व शर्तींद्वारे नियंत्रित केले जाते. अग्निवीरांच्या नियुक्तीच्या अटींनुसार, हुतात्मासाठी अधिकृत मानधन असेल, असं भारतीय लष्कराने पोस्ट करत म्हटले आहे. 

हेही वाचा :  भाजपाकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर, 'या' मतदारसंघातून नरेंद्र मोदी लढणार!

शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबाला किती मानधन मिळणार?

– शहीद अक्षय यांच्या कुटुंबियांनी विम्याच्या रुपात ४८ लाख मिळतील.
– कुटुंबाला अग्निवीरानं योगदान केलेल्या सेवा निधीतील (३० टक्के) रक्कम मिळेल. त्यात सरकार तितक्याच रकमेची भर घालेल. त्यावर व्याजही देईल.
– अक्षय गवतेंच्या सेवेचा ४ वर्षांपैकी जितका कार्यकाळ शिल्लक आहे, तिथपर्यंत त्यांच्या कुटुंबाला पैसे मिळतील. ही रक्कम १३ लाखांपेक्षा अधिक असेल.
– सशस्त्र दल युद्ध कोषातून कुटुंबाला ८ लाख रुपये मिळतील.
– लष्कर पत्नी कल्याण संस्थेतून तात्काळ ३० हजार रुपये मिळतील.
– शहीद अक्षय गवतेंच्या कुटुंबाला एकूण १ कोटी १३ लाखांची मदत मिळेल.

३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय “अग्निवीर”म्हणून सैन्यात भरती झाले होते. शहिद जवान अक्षय यांच्यावर सोमवारी २३ ऑक्टोंबर ला सकाळी त्यांच्या जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अक्षय यांना एक लहान बहिण असून त्यांचे आई- वडील शेती करतात. अक्षय यांची मृत्यूची वार्ता कळताच पिंपळगाव सराई गावावर एकच शोककळा पसरली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …