‘मराठ्यांनो, एकजूट दाखवून द्या’ मनोज जरांगे-पाटील यांचं आवाहन… जालनात जाहीर सभा

Maratha Reservation : कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलंय. शनिवारी जालन्यातल्या (Jalna) आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी आयोजित केलेली भव्य मराठा सभा होतेय. या सभेची जोरदार तयारी झालीय.  5 हजार स्वयंसेवक त्यासाठी तैनात करण्यात आलेत. गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाना,पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आलीय. याचसंदर्भात पोलिसांनीही सुरक्षेसंदर्भात आढावा बैठकही घेतली. शांततेत सभेला येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. या सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक 3 वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आलीय.

मुदतीचे 30 दिवस पूर्ण
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या सभेची जय्यात तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला. शनिवारी या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होतायत त्याच पार्श्वभूमीवर अंतरवाली-सराटीत जरांगेंची सभा होतेय. राज्यभरातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी जालन्यात दाखल व्हायला सुरुवात झालीय.. 

आरक्षणाची लढाई,सभेची जंगी तयारी
250 एकरचं मैदानात मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे.  यासाठी 2 हजार पोलीस कर्मचारी आणि 550 होमगार्ड तैनात करण्यात आलेत. 50 खाटांचा दवाखाना, 300 डॉक्टर्सची सुविधा असणार आहे. 100 हून अधिक प्रसाधनगृहं असणार आहेत. 5 हजार मराठा समन्वयक तैनात करण्यात आलेत चहा, गाडीचे मोफत पंक्चर, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक 3 ठिकाणी वळवण्यात आलीय.

हेही वाचा :  विमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, 'तसा काही...'

मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे प्रखर आंदोलन करतायत. सरकारला दिलेल्या मुदतीचे 30 दिवस शनिवारी पूर्ण होतायत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारला आपल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी जरांगे सभा घेतायत. आता सभेतून जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सदावर्तेंचा आरोप
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची स्टंटबाजी सुरू असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. जरांगे पाटलांच्या माध्यमातून 14 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र पेटवण्याचा घाट घातला जातोय त्यामुळे जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केलीय. तर गुणरत्न सदावर्ते हे मराठाद्वेषी असून मराठा आरक्षणात विष कालवण्याचं काम करत असल्याचा  पलटवार जरांगेंनी केलाय….



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …