मल्याळम लेखक सतीश बाबू पायनूर यांचे निधन; राहत्या घरात संशयास्पद परिस्थित आढळला मृतदेह

Satheesh Babu Payyanur: मल्याळम (Malayalam) लेखक सतीश बाबू पायनूर (Satheesh Babu Payyanur) यांचे गुरुवारी (24 नोव्हेंबर) निधन झाले आहे. सतीश यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला. सतीश यांची पत्नी गुरुवारी घराबाहेर गेली होती. त्यामुळे सतीश हे घरात एकटेच होते. सतीश यांनी कोणाचाही फोन उचलला नाही तसेच दार वाजवल्यानंतर घरातून आवाज आला नसल्यानं, सतीश यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी घरात सतीश यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत अढळला. सतीश यांच्या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालं नाही. 

शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सतीश बाबू पायनूर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. शुक्रवारी (25 नोव्हेंबर) शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पलक्कड येथील पाथिरीपालामध्ये सतीश बाबू पायनूर यांचा जन्म झाला. त्यांनी उच्च शिक्षण हे कान्हागड आणि पयन्नूर येथून पूर्ण केले. सतीश बाबू  पायनूर हे प्रसिद्ध लघुकथा लेखक आणि कादंबरीकार होते.

हेही वाचा :  चप्पल शिवणाऱ्या बापाचं स्वप्न केलं पूर्ण! पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करुन लेक झाली PSI

मन्नू, दैवापुरा, मांजा सूर्यंते नलुकल आणि कुडामणिकल किलुंगिया रविल यासह अनेक कादंबर्‍यांचे ते लेखक आहेत. त्यांनी मलयत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना 2012 मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. केरळच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत असलेल्या भारत भवन या संस्थेचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Priyanshu Kshatriya:’झुंड’ मधील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …