पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! गॅस लीक झाल्याने 9 जण ठार, 11 जण रुग्णालयात दाखल; संपूर्ण परिसर सील

Punjab Gas Leak: पंजाबमधील (Punjab) लुधियाना (Ludhiana) येथील गियासपुरा येथील एका फॅक्टरीतून गॅस लीक (Gas Leak) झाल्याने 9 जण ठार झाले आहेत. तसंच 11 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. 

“हो नक्कीच गॅस लीक झाला आहे. एनडीआरएफ पथकही घटनास्थळी दाखल झालं असून लोकांना बाहेर काढलं जात आहे. बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 11 जणांची प्रकृती गंभीर आहे,” अशी माहिती लुधियानाच्या उपविभागीय दंडाधिकारी स्वाती तिवाना यांनी दिली आहे. 

दरम्यान गॅस लीक किती गंभीर आहे आणि कशामुळे झालं आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. एनडीआरएफ याप्रकरणी अधिक तपास करत करेल अशी माहिती स्वाती यांनी दिली आहे. 

हेही वाचा :  भावाला भांडणातून सोडवायला गेलेल्या गरोदर बहिणीने गमावलं बाळ; धक्कादायक Video समोर

स्थानिक अंजन कुमार याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की “हा विषारी गॅस होता. जवळपास 8 लोक ठार झाले आहेत. तीन मृतदेह निळे पडले होते. श्वास घेण्यासही जमत नाही”.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. तसंच शक्य ती सर्व मदत दिली जात असल्याची माहिती दिली आहे. भगवंत मान यांनी ट्वीट केलं आहे. “लुधियानात झालेली गॅस लीकची घटना दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झालं आहे. सर्व मदत केली जात आहे”, असं भगवंत मान यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. 

दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून 9 जण ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …