माजलगावच्या अनिलकुमार साळवे यांनी न्यू जर्सी येथील फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला पुरस्कार

Global Adgaon Movie: बीडच्या (Beed) माजलगावच्या (Majalgaon) अनिलकुमार साळवे (Anilkumar Salve) यांनी दिग्दर्शित केलेला ग्लोबल आडगाव (Global Adgaon) या चित्रपटानं अमेरिकेतील न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये (New Jersey Film Festival) पुरस्कार पटकावला आहे. अनिलकुमार साळवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून 672 कलाकारांचा हा भव्यदिव्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

“ग्लोबल आडगाव”  चित्रपटाची आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. या चित्रपटाला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच झालेल्या अमेरिकेतील न्यू जर्सी या आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांना ग्लोबल आडगाव चित्रपटासाठी ‘बेस्ट स्टोरी रायटर फीचर फिल्म” (The Best Story Writer Feature Film) हा पुरस्कार मिळाला आहे. 

अनिलकुमार साळवे यांनी यापूर्वी 4 लघुपट दिग्दर्शित केले आणि 39 एकांकिका, 6 नाटक 12, पथनाट्य लिहिली आहेत.  ‘ग्लोबल आडगाव’ या चित्रपटाची कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील निवडण्यात आली होती. या चित्रपटाला बेस्ट फिल्म आणि बेस्ट डायरेक्टरसाठी नामांकन प्राप्त झाले. 

‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटात ‘या’ कलाकारांनी साकारली भूमिका 
सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde), उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती,जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, आशिर्वाद नवघरे, प्रियंका सदावर्ते, जगदीश गोलहार,ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,मंगेश तुसे, वैदेही कदम यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  ग्लोबल आडगाव चित्रपटांसाठी अशोक कानगुडे या अभिनेत्याला अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी या चित्रपटामधील गाणी गायली आहेत. 

हेही वाचा :  Amitabh Bachchan : बिग बी भावूक, छोटा मित्र सोडून गेल्याचं दु:ख; पोस्ट चर्चेत

‘या’ विषयांवर भाष्य करणारा चित्रपट

‘ग्लोबल आडगाव’ या सिनेमांमधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेला शेतकरी , ग्लोबलायझेशनचा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती या क्षेत्रावर नेमका कसा परिणाम झाला? या महत्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आलेले आहे. लवकरच हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटानं अनेक पुरस्कार पटकावल्यानं या चित्रपटाचं कौतुक होत आहे. 

Global Adgaon Movie: कौतुकास्पद! ‘ग्लोबल आडगाव’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …