महाशिवरात्रीला घाला महादेवांच्या आवडत्या या कलरची कपडे,भगवान शंकरांची कायम बरसेल कृपादृष्टी

महाशिवरात्री म्हणजे समस्त भारतासाठी एक मोठा उत्सवच! भगवान शंकरांच्या भक्तगणांसाठी आणि सर्वसामान्य भाविकांसाठी सुद्धा हा एक सर्वात मोठा दिवस आहे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व असल्याने संबंध जगभरातील हिंदू धर्मीय हा महादेवाचा सण धुमधडाक्यात साजरा करतात. पण तुम्हाला माहित आहे का महाशिवरात्री का साजरी करतात? तर मंडळी पुराणानुसार, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि विश्वाला विनाशापासून वाचवले आणि तोच दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय.

अजून एका कथेनुसार या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. अजून एका मान्यतेनुसार, महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती. तोच हा दिवस महाशिवरात्री होय. तर अशा अनेक दंतकथा असो वा मान्यता, आपल्यासाठी मात्र तनमनात शिव हा जप बसतो ज्याच्या प्रेमापोटी आपण त्याची भक्ती करण्यासाठी तयार होऊन आजच्या दिवशी मंदिरात जातो. पण मंदिरात जाण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी व महादेवांची आवड-निवड तुम्हाला माहितच हवी. (फोटो सौजन्य :- Instagram Janhvikapoor, madhuridixitnene, norafatehi, TOI, bhagyashree.online, saraalikhan95, realhinakhan)

महादेवांना कोणता रंग आवडतो?

महादेवांना कोणता रंग आवडतो?

महाशिवरात्रीला नक्की कोणते कपडे घालून बाहेर पडावं किंवा हा दिवस साजरा करताना कोणत्या रंगाचे कपडे घालावेत हा अनेकांना सतावणारा प्रश्न होय. या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केले जाते आणि त्याचा रंग हिरवा असतो. शिवाय भगवान भोलेनाथांना हिरवा रंग खूप प्रिय देखील आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला या महाशिवरात्रीसाठी खास ह्याच रंगाशी संबधित आउटफिट आयडियाज देणार आहोत ज्या तुम्ही कॅरी करू शकता.

हेही वाचा :  सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवशंकर आणि माता पार्वतीकडून घ्या असा आदर्श, टिकेल नाते जन्मभर

(वाचा :- या IAS ऑफिसरची बायको मलायका व नोरापेक्षाही खूप सुंदर, काचेसारखं लख्ख अन् पाण्यासारखं नितळ सौंदर्याची राणीच जणू)​

फ्लोरल थ्रेड एम्ब्रॉयडरी असलेला कुर्ता सेट

फ्लोरल थ्रेड एम्ब्रॉयडरी असलेला कुर्ता सेट

आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, हिरवा रंग भगवान शंकरांना खूप प्रिय आहे, म्हणून तुम्ही या रंगाचा कोणताही सूट किंवा साडी या दिवशी परिधान करू शकता. सूटच्या अनेक डिझाइन्स आणि पॅटर्न आहेत, आम्ही त्यातीलच एक झलक तुमच्यासमोर मांडली आहे. या फोटोमध्ये नोरा पेस्टल ग्रीन कलरचा फ्लोरल थ्रेड एम्ब्रॉयडरी सूट घालून गोटा पट्टी आणि सिक्विन वर्कमध्ये दिसत आहे. हा एक प्रकारचा शरारा सेट आहे, जो आजकाल खूप ट्रेंड करत आहे.

(वाचा :- हार्दिक पांड्याला सरप्राईज देण्यासाठी नताशाने गाऊनवर कोरलेल्या 2 अक्षरांचे रहस्य अखेर उघड, बायको असावी तर अशीच)​

प्रिंटेड कुर्ता सुद्धा करू शकता ट्राय

प्रिंटेड कुर्ता सुद्धा करू शकता ट्राय

हिरवे वस्त्र परिधान करून भगवान भोलेनाथांची पूजा केल्यास भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात असे म्हणतात. जर तुमच्याकडे पूर्णपणे हिरव्या रंगाचा सूट नसेल तर तुम्ही मिक्स रंगाचा कुर्ता देखील कॅरी करू शकता. फोटोमध्ये, कंगनाने पेस्टल ग्रीन ड्रेस परिधान केलेला दिसत आहे ज्यावर लाल फ्लोरल प्रिंट आहेत. तर दुस-या फोटोत अगदी सेम पेस्टल रंगाचा थ्री पीस सेट परिधान केला आहे ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. अशा प्रकारचे आउटफिट हे थोडे वेगळे दिसते आणि पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर देखील खेचून घेते.
(वाचा :- लालभडक लिपस्टिक अन् ऑफ शोल्डर टॉपमधील दिशा परमारचा हटके लुक, बायकोची किलर चाल बघून राहुल वैद्यही पार घायाळ..!)

हेही वाचा :  शेतकरी तरुणाने 2 लाख रुपये देऊन लग्न केलं, 20 व्या दिवशीच बसला धक्का, नवरीमुलगीच निघाली...

साडी करू शकता ट्राय

साडी करू शकता ट्राय

जर तुम्हाला साडी नेसण्याची आवड असेल तर तुम्ही कॉटन आणि सिल्क प्रिंटेड साड्या देखील कॅरी करू शकता. तुमच्या वॉर्डरोबमध्ये एखादी हिरवी साडी तर नक्कीच असेल, जी तुम्ही हाफ स्लीव्हज सोबत टीम-अप करू शकता. या लुकसोबत ड्रॉपडाउन इअररिंग्स पेअर करता येतात.
(वाचा :- Kiara-Sidharthच्या रिसेप्शनला अवतरलं बॅकलेस मिनी फ्रॉकमधलं फुलपाखरू, पण लक्ष वेधलं ब्रालेट ब्लाऊजमधील अनन्याने)​

ऑफिस गोइंग गर्ल्स असाल तर

ऑफिस गोइंग गर्ल्स असाल तर

पेस्टल ग्रीन कलरच्या सूटमध्ये अतिशय सिम्पल पण सुंदर दिसणाऱ्या सारा अली खानचा हा लूक पहा. कुर्त्यावर गुलाबी रंगाचे फ्लोरल प्रिंट्स अतिशय सुंदर दिसत आहेत आणि या प्रकारचा कुर्ता सेट ऑफिसला जाणाऱ्या मुलींसाठी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही जर ऑफिस गोइंग असाल तर हा कुर्ता सेट अवश्य ट्राय करा.
(वाचा :- पारंपारिक ड्रेसमध्ये सारा-जान्हवीची चुरशीची लढत, ही सुंदर की ती? लोभस लावण्यवतींना बघून 2 सेकंद डोकं होईल हॅंग)​

हलक्या एम्ब्रॉयडरीचे ड्रेस

हलक्या एम्ब्रॉयडरीचे ड्रेस

जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क असलेला ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही हिना खानच्या या लूकवरून टिप्स घेऊ शकता. या ऑलिव्ह ग्रीन कलरच्या कुर्त्यावर सिल्व्हर वर्टिकल स्ट्राइप्स दिसत आहेत ज्या ह्या कुर्त्याला युनिक बनवत आहेत. यासोबत चांदीची गोटा पट्टी असलेला दुपट्टा कॅरी करण्याची हीनाची आयडीया देखील परफेक्ट ठरली. सोबत तिने चोकर नेकलेस, बिंदी, कानात झुमके परिधान करून आपले केस मोकळे ठेवले होते.
(वाचा :- Ex बॉयफ्रेंड Sidharth Malhotra च्या रिसेप्शनला डायमंड साडीत आलियाची रॉयल एंट्री, अदांपुढे नवरी Kiara पडली फिकी)​

हेही वाचा :  जाळीदार ड्रेसमध्ये मालती मेरीच्या आईचा ग्लॅमरस अंदाज फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

शॉर्ट हाईट गर्ल्ससाठी

शॉर्ट हाईट गर्ल्ससाठी

ज्या मुलींची उंची कमी आहे त्यांनी असे हिरव्या रंगाचे कुर्ते वापरून नक्कीच पाहावेत. जे वरपासून खालपर्यंत एकाच रंगाचे असतील. आलियासारखा असा मोनोक्रोमॅटिक लूक तुम्हाला सुद्धा परफेक्ट दिसू शकतो. ह्या सूटवर मोटिफ्स सह गोल्डन गोटा पट्टीचा दुपट्टा होता. ड्रॉपडाउन ईयररिंग्स आणि मिनिमल मेकअपसह आलीया खूप गोड दिसत आहे.
(वाचा :- नेटची काळीभोर साडी,हि-यांची भरजरी नक्षी,ऑफशोल्डर ब्लाऊज,काळीकुट्ट नेलपेंट,हुमा कुरेशीचंं मंत्रमुग्ध करणारं रूप)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …